मुंबई

ई-सिगारेटचा सहा लाखांचा साठा जप्त

CD

नवी मुंबई, ता. ५ (वार्ताहर) : अमली पदार्थविरोधी पथकाने खारघर सेक्टर-४ मधील ‘लक्ष्मण व्हिला’ या इमारतीवर छापा मारून गाळ्यामध्ये विक्री करण्यासाठी लपवून ठेवण्यात आलेला सुमारे सहा लाख ४४ हजार रुपये किमतीचा ई- सिगारेटचा साठा जप्त केला आहे. या कारवाईत पोलिसांनी अर्जुन भिमा राठोड (वय २७) याला अटक केली आहे. खारघर सेक्टर-४ मधील ‘लक्ष्मण व्हिला’ इमारतीतील महावीर एक्स्प्रेस सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड या गाळ्यांमध्ये ई-सिगारेटचा साठा करून ठेवण्यात आल्याची माहिती अमली पदार्थविरोधी पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बी. एस. सय्यद यांनी कारवाई करण्याच्या सूचना दिल्यानंतर पोलिस उपनिरीक्षक कुलदीप मोरे व पथकाने गाळ्यावर छापा टाकला. गाळ्यामध्ये बेकायदा साठा करण्यात आलेला तब्बल सहा लाख ४४ हजार रुपये किमतीच्या विविध फ्लेव्हरच्या ई-सिगारेटचा साठा आढळून आला. साठा करून ठेवणाऱ्या अर्जुन राठोड याच्याविरोधात खारघर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Telangana CM Revanth Reddy : तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना दिल्ली पोलिसांचं समन्स; अमित शाहांच्या व्हिडीओचं प्रकरण

Sairat Complete 8 Years : मराठी सिनेमाला १०० कोटींचं स्वप्न दाखवणाऱ्या 'सैराट'ला ८ वर्षं पूर्ण; रिंकूची पोस्ट चर्चेत

Share Market Closing: शेअर बाजारात तुफान तेजी; सेन्सेक्स 900 अंकांच्या उसळीसह बंद, गुंतवणूकदार मालामाल

Latest Marathi News Live Update: अमित शहांच्या एडिटेड व्हिडिओ प्रकरणी तेलंगानाच्या मुख्यंत्र्यांना समन्स

Nashik News : मालेगावी भाजीपाल्याची आवक स्थिर! मे, जून महिन्यात उत्पादन घटण्याचा अंदाज

SCROLL FOR NEXT