मुंबई

निर्मल हाऊसिंग प्रकरणी आरोपी संचालकाविरोधात फसवणुकीची अजून एका गुन्हा

CD

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ६ : मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने निर्मल लाईफस्टाईल लिमिटेडचे संचालक धर्मेश जैन आणि राजीव जैन यांच्यावर आणखी एका गृहनिर्माण प्रकरणातील फसवणुकीबाबत गुन्हा दाखल केला आहे. गृहनिर्माण प्रकल्पात ५४ सदनिका खरेदीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी कंपनीच्या दोन्ही संचालकांना अटक करण्यात आली आहे. मुलुंड पश्चिमेतील गृहनिर्माण प्रकल्पातील सदनिकाधारकांची आर्थिक फसवणूक करून आरोपी संचालकांनी आजतागायत त्यांना सदनिका हस्तांतरित केलेल्या नाहीत.

आर्थिक गुन्हे शाखेने धर्मेश आणि राजीव यांना याआधी २७ एप्रिल रोजी अटक केली होती. गुरुवारी पहिल्या गुन्ह्यात मुंबईतील न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्यानंतर शुक्रवारी आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी दुसऱ्या प्रकरणात चौकशीसाठी त्यांना ताब्यात घेतले. आता आर्थिक गुन्हे शाखा दोन्ही आरोपी संचालकांची एकूण तीन प्रकरणांत चौकशी करत आहे. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने पहिल्यांदा डिसेंबर २०२१ मध्ये दोघांविरोधात गुन्ह्याची नोंद केली होती.

५४ सदनिकाधारकांची फसवणूक
नवीन नोंदवलेल्या गुन्ह्यात मुलुंड पश्चिमेतील एलबीएस मार्गावर असलेल्या ३९ मजली ‘झिरकॉन’ गृहनिर्माण प्रकल्पात ५४ सदनिकाधारकांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. आरोपात दाखल केलेल्या तक्रारीवर हा गुन्हा आधारित आहे. सदनिका वेळेवर न मिळाल्याने खरेदीदारांनी झिरकॉन फ्लॅट ओनर्स वेल्फेअर असोसिएशनची स्थापना केली. असोसिएशनच्या माध्यमातून पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिस तपासात सदनिका खरेदीदारांकडून विकसकाने ८० कोटी ९३ लाख रुपये स्वीकारल्याची माहिती उघड झाली. विकसकाकडून सादर करण्यात आलेल्या कागदपत्रानुसार, त्यातील ८० सदनिकाधारकांना पूर्ण रक्कम, तर १७७ जणांना अंशतः रक्कम परत करण्यात आली आहे. १३२ सदनिकाधारकांना प्रकल्पातून बाहेर पडायचे नसल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. सदनिकाधारकांकडून स्वीकारण्यात आलेल्या एकूण रकमेपैकी ३९ कोटींचा दावा अद्याप बाकी असल्याचे सूत्रांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baramati Lok Sabha Election : 'तुम्ही आमचा जीव, आत्मा आहात...' बारामतीमधील सभेत रोहित पवारांना अश्रू अनावर

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : सीएसकेचाही पलटवार; देशपांडेने दुसऱ्याच षटकात दिले दोन धक्के

Loksabha election 2024 : ''आम्ही खोक्यांच्या मागे गेलो नाहीत; कारण...'', 'सकाळ'च्या मुलाखतीत विनायक राऊत स्पष्टच बोलले

Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेचा भगवान कुबेरांशी काय संबंध आहे? जाणून घ्या कारण

SCROLL FOR NEXT