मुंबई

जिल्ह्यात तंत्रशिक्षण विद्यापीठ सुरू करणार

CD

डहाणू, ता. ७ (बातमीदार) ः पालघर जिल्ह्यात तंत्रशिक्षण विद्यापीठ सुरू करण्याचा प्रयत्न सुरू असून तंत्रशिक्षणातील आयटीआयमध्ये अनेक अभ्यासक्रम आहेत. आपल्या कौशल्यानुसार त्यात प्रावीण्य मिळवा आणि औद्योगिक प्रशिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी आणि स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी पाठबळ द्या, असे आवाहन पालघर लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजेंद्र गावित यांनी केले.
संगणकीय डिजिटल स्पर्धेच्या युगात स्वतःच्या वृद्धी सोबतच आपला समाज, गाव, जिल्हा यांनाही पुढे घेऊन जा, असेही खासदार गावित यांनी सांगितले. चिंचणी येथे कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यपूर्ण महाराष्ट्र राज्य आयोजित छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, त्या वेळी खासदार राजेंद्र गावित बोलत होते. या कार्यक्रमाला शिक्षणतज्ज्ञ रजनीकांतभाई श्रॉफ, जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष पंकज कोरे, जिल्हा परिषद सदस्य जयेंद्र दुबळा, चिंचणीचे सरपंच नितेश दुबळा, रमेश वझे, संजय भोई, जिल्हा व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण अधिकारी महेश कुमार सिदाम यांच्यासह अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'पवित्र ग्रंथ गुरु साहिब'ची पानं गुरुद्वारात घुसून फाडली! जमावाच्या बेदम मारहाणीत तरुणाचा मृत्यू

Nick Jonas: देसी गर्ल प्रियांका चोप्राचा पती निक जोनासची तब्येत बिघडली; व्हिडीओ शेअर करत म्हणाला...

Job Discrimination : मुंबईत नोकरी, पण मराठी माणसालाच नो एन्ट्री? लिंक्डइनवरील पोस्ट होतेय व्हायरल

Samruddhi Accident: समृद्धी महामार्गावरील अपघात कधी थांबणार? कारला मागून धडक दिल्याने तिघांचा मृत्यू

Bhavesh Gupta:'पेटीएम'च्या अध्यक्षांचा कंपनीला रामराम, तडकाफडकी घेतला करिअर ब्रेकचा निर्णय

SCROLL FOR NEXT