मुंबई

दृष्‍टीक्षेप

CD

दोन आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये मुकेश पटेल स्कूलचे यश
मुंबई ः श्री विलेपार्ले केळवणी मंडळाच्या मुकेश पटेल स्कूल ऑफ टेक्नॉलॉजी मॅनेजमेंट अँड इंजिनियरिंगच्या विद्यार्थ्यांनी दोन आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये मोठे यश मिळवले आहे. त्यांना पॅरिसमध्ये झालेल्या ‘हारवर्ड वर्ल्ड एमयूएन’ या परिषदेत दोन हारवर्ड डिप्लोमासी पुरस्‍कार आणि चार सोशल व्हेंचर चॅलेंज पुरस्‍कार मिळाले. त्याचबरोबर त्यांना एसएएस क्युरिऑसिटी कप या जागतिक स्पर्धेतही दुसरा क्रमांक मिळाला. हारवर्ड वर्ल्ड एमयूएन परिषदेत जगभरातून पंधराशे प्रतिनिधी सहभागी झाले होते. भारतातून फक्त मुकेश पटेल स्कूलच्या विद्यार्थ्यांनीच पुरस्कार मिळविला. जश दमानी आणि अनुराधा बन्सल यांना हारवर्ड डिप्लोमसी अवॉर्ड मिळाला. या परिषदेत पर्यावरण, डिजिटायझेशन, आरोग्यसेवा, स्वच्छ ऊर्जा आदी विषयांवर भर देण्यात आला होता. त्यामुळे मुकेश पटेल स्कूलला मिळालेले यश हे त्यांच्या सामाजिक उत्तरदायित्वाचे आणि नवकल्पनांचे निदर्शक आहे, असे अधिष्ठात्या डॉ. अलका महाजन म्हणाल्या.

‘ब्रह्माकुमारी’तर्फे मान्यवरांचा सत्कार
मुलुंड (बातमीदार) ः ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय मुलुंड पूर्व केंद्रातर्फे विविध क्षेत्रांमध्ये उल्‍लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा केंद्राच्या संचालिका छाया दीदी यांनी गौरव केला आहे. यामध्ये सुधागड येथील ॲड. सुभाष पाटील यांचा समावेश आहे. या कार्यक्रमाला सुधागडचे आमदार धैर्यशील पाटील यांच्यासह नगराध्यक्ष उपस्थित होते. सुधागडमध्ये विकासकामे आणि सामाजिक कार्य केल्याबद्दल सुभाष पाटील यांना गौरवण्यात आले असल्याचे छाया दीदी यांनी या वेळी सांगितले. या प्रसंगी परिसरामधील शिक्षक, शिक्षिका, समाजसेवक, वकील आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

स्‍वच्छतागृहाचे पाणी रस्‍त्‍यावर
मालाड (बातमीदार) ः कांदिवली पूर्वेतील हनुमान नगर नरसीपाडा येथील सार्वजनिक स्‍वच्छतागृहाचे पाणी रस्त्यावर वाहत आहे. या पाण्यामुळे स्थानिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. तसेच सर्व परिसरात दुर्गंधी पसरली आहे. येथील रहिवासी राज लुयीस, दीपक रासकर, दीपक गवई यांनी याबाबत पालिकेच्या आर दक्षिण विभागाकडे तक्रार केली आहे. मात्र अद्याप कार्यवाही न झाल्‍याने नागरिकांनी संताप व्यक्‍त केला आहे. दरम्‍यान, काही नागरिकांनी खासदार गोपाळ शेट्टी यांना माहिती दिली असता त्यांनी या समस्येबाबत सहाय्यक आयुक्तांना पत्र लिहून समस्या सोडवण्याची सूचना केली आहे. मात्र याकडेही पालिकेने दुर्लक्ष केल्‍याचा आरोप नागरिकांनी केला आहे. तसेच येथे पालिकेने त्‍वरित कार्यवाही करण्याची मागणी केली आहे.

नालेसफाईचा गाळ रस्‍त्‍यावर
चेंबूर (बातमीदार) ः चेंबूर, कुर्ला, टिळकनगर परिसरात पालिका ठेकेदारामार्फत नालेसफाई करण्यात येत आहे. मात्र नाल्यातून काढण्यात आलेला कचरा व गाळ रस्त्यावर टाकण्यात आला आहे. त्यामुळे रस्त्यावरून प्रवाशांना चालणे मुश्किल झाले आहे. कुर्ला, टिळकनगर, गोवंडी व चेंबूर येथील एन. जी. आचार्य मार्ग, नटराज सिनेमा, चेंबूर नाका, वाशीनाका व टिळक नगर परिसरातील नालेसफाई करण्यात येत आहे. नाल्यातून काढण्यात आलेला गाळ तीन दिवस उलटले तरी अद्याप उचलण्यात आलेला नाही. त्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरत आहे. या गाळावरून वाहनचालक व दुचाकीस्वार बिनधास्त वाहने चालवीत असल्याने गाळ मार्गावर पसरत आहे. त्‍यामुळे हा गाळ लवकरात लवकर उचलावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

मुलुंडमध्ये टेबल टेनिस स्पर्धा
मुलुंड (बातमीदार) ः मुलुंडमध्ये नुकतेच खासदार खेळ महोत्सवाचे आयोजन केले आहे. या अंतर्गत १३ मे रोजी सकाळी दहा वाजता मुलुंड पश्चिमेतील कालिदास बॅडमिंटन हॉलमध्ये टेबल टेनिस ही स्पर्धा होणार आहे. खासदार मनोज कोटक यांच्या मार्गदर्शनाखाली ३० प्रकारच्या विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे या महोत्सवामध्ये दीड लाखाहून अधिक खेळाडूंचा सहभाग आहे. तब्बल १०० ठिकाणी विविध खेळांचे आयोजन या निमित्ताने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी कार्यालयामध्ये अनुपम जोशी, प्रकाश केळकर आणि जीत बांगर यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

बँकेच्या अध्यक्षपदी प्रविणा ठक्कर
चेंबूर (बातमीदार) ः द चेंबूर नागरिक सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी प्रविणा ठक्कर यांची नियुक्‍ती झाली आहे, तर उपाध्यक्षपदी अनिल ठाकूर यांची निवड करण्यात आली आहे. ही नियुक्‍ती २०२३ ते २०२८ या कालावधीकरीता असून दोघांची निवड बिनविरोध झाल्‍याने कौतुक केले जात आहे. अनिल ठाकूर यापूर्वी रेल्वे कमिटी व बँकेच्या संचालक पदावर कार्यरत होते. या त्यांच्या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.

रोटरी क्लबतर्फे लीग क्रिकेट स्पर्धा
मुलुंड (बातमीदार) ः रोटरी क्लब ऑफ मुलुंड यांच्या सहकार्याने मुलुंड सोसायटीज लीगचे आयोजन केले होते. निर्मल लाईफ स्टाईल ऑफ शॉर्ट टर्फ क्लब येथे या क्रिकेट स्पर्धा पार पडल्‍या. यामध्ये मुलुंडमधील सर्व गृहनिर्माण संस्थांचे संघ सहभागी झाले होते. भविष्य विश्वकर्मा यांच्या नेतृत्वाखाली गोवर्धन नगर संघाने अंतिम सामना जिंकला. मॅन ऑफ द सीरिज पुरस्कारही भविष्य विश्वकर्मा यांना देण्यात आला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MS Dhoni IPL 2024 : 'धोनीला 9व्या क्रमांकावर बॅटिंग करायची असेल तर त्याने खेळू नये...', चेन्नईच्या थालावर भडकला मुंबईचा माजी कर्णधार

Latest Marathi News Update : झारखंडमध्ये ईडीचे छापे, मंत्र्याच्या कर्मचाऱ्याकडून करोडोंची रोकड जप्त

Bajrang Punia : नाडाकडून बजरंग पुनिया निलंबित नमुना; चाचणीला नकार,कुस्ती संघटना ‘वाडा’शी संपर्क साधणार

Aerobic Exercise : वजन कमी करण्यासाठी घरच्या घरी करा ‘हे’ एरोबिक व्यायाम प्रकार, मानसिक अन् शारिरीक आरोग्य राहील तंदूरूस्त

Pune News : क्रिकेटच्या चेंडूने घेतला होतकरू खेळाडूचा बळी! अवघड जागी चेंडू लागल्यामुळे ११ वर्षांच्या मुलाचा मृत्यु

SCROLL FOR NEXT