मुंबई

रस्त्यांच्या झळाळीतून सुसाट विकास

CD

मनोर, ता. १० (बातमीदार) : पालघर जिल्हा निर्मितीपासून ग्रामीण, तसेच दुर्गम भागात रस्त्यांचे जाळे निर्माण करण्याच्या मागणीला यश आले आहे. ग्रामीण भागातील रस्त्यांच्या विकासासाठी पंतप्रधान ग्रामसडक आणि मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून तीनशे कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. दोन्ही योजनांमधून सुमारे २९४ किलोमीटर लांबीच्या ६४ रस्ते तयार केले जाणार असल्याने ग्रामीण भागातील रस्त्यांना झळाळी मिळणार आहे. या रस्ते कामांच्या निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून कार्यादेश दिले जात आहेत. दरम्यान पावसाळ्याला महिन्याचा अवधी शिल्लक असल्याने रस्त्यांची कामे पावसाळ्यानंतर सुरू होणार असल्याची माहिती ग्रामीण रस्ते विकास यंत्रणेकडून देण्यात आली.

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील रस्ते तयार करण्यासाठी १९४ कोटींचा निधी प्राप्त झाला आहे. जिल्ह्याच्या आठ तालुक्यांतील १७३ किलोमीटर लांबीचे ४७ रस्ते तयार केले जाणार आहेत. त्यासाठी निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. रस्ते तयार केल्यानंतर पाच वर्षांच्या देखभाल दुरुस्तीसाठी १२.२४ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

पंतप्रधान ग्रामसडक योजनेअंतर्गत जिल्ह्यासाठी १०५.३९ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला असून आठ तालुक्यांमधील १७ ठिकाणचे मिळून १२१.३९ किलोमीटर लांबीचे रस्ते तयार केले जाणार आहेत. रस्त्यांच्या कामांची निविदा प्रक्रिया राबवण्यात येत असून पावसाळ्याआधी रस्त्यांच्या कामांचे कार्यादेश दिले जाणार असून प्रत्यक्ष कामाला सुरुवात पावसाळ्यानंतर होणार आहे. ग्रामीण भागातील रस्त्यांच्या विकासासाठी मोठा निधी उपलब्ध झाल्याने जिल्हावासीयांनी समाधान व्यक्त केले आहे.

आशियायी विकास बँकेकडून ८६ किमीचे रस्ते
आशियायी विकास बँक अर्थसाह्याने जिल्ह्यातील रस्त्यांची दर्जोन्नती करण्यासाठी २९ मार्च २०२३ रोजी ग्राम विकास विभागाकडून प्रशासकीय मान्यता देण्यात आली. आठ तालुक्यांमधील २५ रस्त्यांची एकूण ८६.६६० किलोमीटर लांबीच्या ८६.२४ कोटी रुपयांच्या रकमेला प्रशासकीय मान्यता देण्यात आली. या रस्त्यांच्या पाच वर्षांच्या देखभाल दुरुस्ती कामासाठी ५.८६ कोटी रुपये उपलब्ध असणार आहेत.

जिल्हा योजनेतून ६६ किमीचे रस्ते
जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण (डीपीसी) अंतर्गत उपलब्ध निधीतून पालघर जिल्ह्यातील रस्त्यांची दर्जोन्नती करण्यासाठी ८ मार्च२०२३ रोजी ग्रामविकास विभागाकडून प्रशासकीय मान्यता देण्यात आली. एकूण ६६.५७० किलोमीटर लांबीचे १६ रस्ते तयार केले जाणार आहेत. यासाठी ६७.३१ कोटी रुपये उपलब्ध झाले असून पाच कोटी रुपये रस्त्यांच्या देखभाल दुरुस्तीसाठी राखीव ठेवण्यात आले.

राज्य सरकारकडून १९.९१० किमीचे सहा रस्ते
राज्य सरकारच्या निधीतून सहा रस्त्यांची दर्जोन्नती करण्यासाठी २९ मार्च २०२३ रोजी ग्रामविकास विभागाकडून प्रशासकीय मान्यता देण्यात आली. एकूण १९.९१० किलोमीटर लांबीचे सहा रस्ते तयार केले जाणार आहेत. यासाठी २८.५३ कोटी रुपये उपलब्ध झाले असून एक कोटी २९ कोटी रुपये रस्त्यांच्या देखभाल दुरुस्तीसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत.

पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून १२१ किमीचे रस्ते
पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून ग्रामीण आणि दुर्गम भागातील १७ रस्त्यांच्या विकासासाठी १०५ कोटी रुपयांच्या निधी उपलब्ध झाला असून १२१ किलोमीटर लांबीचे रस्ते तयार केले जाणार आहेत. या रस्त्यांच्या कामांच्या निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून लवकरच पात्र कंत्राटदारांना कार्यादेश देण्यात येणार आहेत.

४७ रस्त्यांच्या निर्मितीसाठी निधी (कोटींमध्ये)
आशियायी विकास बँक ८६.२५
जिल्हा विकास योजना ६७.३१
राज्य सरकार २८.५३

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या
तालुकानिहाय रस्त्यांची संख्या
पालघर ८
डहाणू ८
तलासरी ५
विक्रमगड ४
वाडा ७
जव्हार ६
मोखाडा २
वसई ७

मुख्यमंत्री ग्रामसडक योजना
१७३ किलोमीटर लांबीचे ४७ रस्ते

पंतप्रधान ग्रामसडक योजना
१२१ किलोमीटर लांबीचे १७ रस्ते

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Telangana CM Revanth Reddy : तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना दिल्ली पोलिसांचं समन्स; अमित शाहांच्या व्हिडीओचं प्रकरण

Sairat Complete 8 Years : मराठी सिनेमाला १०० कोटींचं स्वप्न दाखवणाऱ्या 'सैराट'ला ८ वर्षं पूर्ण; रिंकूची पोस्ट चर्चेत

Share Market Closing: शेअर बाजारात तुफान तेजी; सेन्सेक्स 900 अंकांच्या उसळीसह बंद, गुंतवणूकदार मालामाल

Latest Marathi News Live Update: सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरणी तीन आरोपींना पोलीस कोठडी तर एकाला न्यायालयीन कोठडी

Nashik News : मालेगावी भाजीपाल्याची आवक स्थिर! मे, जून महिन्यात उत्पादन घटण्याचा अंदाज

SCROLL FOR NEXT