मुंबई

अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

CD

नवीन पनवेल, ता. ९ (वार्ताहर) : शहरात पदपथ आणि रस्ते अडवून व्यवसाय करणाऱ्या अनधिकृत फेरीवाल्यांवर पनवेल महापालिकेने धडक कारवाई करून अनधिकृत फेरीवाल्यांनी कब्जा केलेले पदपथ मोकळे केले आहेत. त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. तसेच पालिकेने अशीच कारवाई सुरू ठेवावी, अशी मागणी केली आहे.
पनवेल शहरातील पदपथांवर बेकायदा फेरीवाल्यांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केल्यामुळे नागरिकांना रस्त्यावरून चालावे लागत आहे. फेरीवाल्यांसाठी भूखंड उपलब्ध करूनदेखील बहुतांश फेरीवाले पदपथ अडवून व्यवसाय करत आहेत. अनधिकृत फेरीवाल्यांवर पनवेल महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी अनेक राजकीय, सामाजिक संघटनांनी पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांच्याकडे केली होती. त्यानुसार आयुक्त गणेश देशमुख यांच्या आदेशाने महापालिका प्रशासनाने अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई करून अनधिकृत फेरीवाल्यांनी कब्जा केलेले पदपथ मोकळे केले आहेत.

--------------
साहित्य जप्त
फेरीवाले व्यवसायासाठी वापरत असलेल्या हातगाड्या तसेच बांबू आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले. तसेच काही ठिकाणी या फेरीवाल्यांनी अनधिकृतपणे पेटारा बनवून त्यामध्ये आपले साहित्य ठेवले होते. महापालिका अतिक्रमण पथकाने या पेटाऱ्यांना तोडून टाकत आतमधील साहित्य जप्त केले आहे. त्यामुळे अशाप्रकारे अनधिकृतपणे व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. महापालिकेच्या या धडक कारवाईमुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, RCB vs CSK: चेन्नईचा 17 व्या हंगामातील प्रवास थांबला! धोनीचीही कारकिर्द संपली? सामन्यानंतरचा पाहा Video

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

IPL 2024: RCB चा आनंद गगनात मावेना! प्लेऑफमध्ये पोहचताच केला जोरदार जल्लोष, पाहा Video

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

SCROLL FOR NEXT