मुंबई

घणसोलीत खारफुटीचे अस्तित्वपणाला

CD

घणसोली, ता.१०(बातमीदार)ः नवी मुंबई महापालिकेच्या घनकचरा विभागाने घणसोली विभागातील कचराकुंड्या हटवण्यात आल्या आहेत. त्यामुळे खारफुटी क्षेत्रात कचरा जाळला जात असून खारफुटीचे क्षेत्रच धोक्यात आले आहे.
घणसोली विभागाला मोठ्या प्रमाणात खारफुटीने विळखा घातला आहे. या परिसरात काही अज्ञातांकडून कचरा तसेच खारफुटी जाळण्याचा प्रकार होत आहे. यामुळे खारफुटी क्षेत्राचे मोठे नुकसान झाले असून खारफुटीच्या वाढीसाठी घातक आहे. तसेच उघड्यावर कचरा जाळण्यास बंदी असताना देखील या ठिकाणी कचरा जाळला जात आहे. यामुळे घणसोली खारफुटी क्षेत्रा लगतच्या परिसरात मोठ्या प्रमाणे धुराचे लोट पाहायला मिळाले आहेत. त्यामुळे अज्ञातांकडून कांदळवनांचे नुकसान होत असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. कचरा आणि खारफुटी जळत असल्याने याचा त्रास नागरिकांना होत असून नागरिकांना प्रदूषणाला सामोरे जावे लागत आहे. याबाबत घनकचरा विभागाशी संपर्क केला असता या ठिकाणी कोळी बांधवांची मत्स्यशेती असल्याने हा कचरा जाळला जात असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
-------------------------------------------
आरोग्याच्या समस्या
खारफुटी क्षेत्रात वारंवार होणाऱ्या कचरा आणि खारफुटी जळतीमुळे मोठ्या प्रमाणात धुराचे लोट निर्माण होत असल्याने स्थानिक नागरिकांना श्वास घेण्यात अडथळा येत आहे. यामुळे स्थानिकांना आरोग्याच्या समस्या जाणवत असून कचरा जाळणाऱ्यांवर कारवाईची मागणी होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal: "....म्हणून आम्ही केजरीवालांच्या जामिनाचा विचार करु शकतो"; सुप्रीम कोर्टाचा ईडीला इशारा

Supriya Sule : आईवर बोलला तर करारा जबाब देईन - सुप्रिया सुळे

Arvind Kejriwal : ''केजरीवाल अन् सिसोदिया यांच्याविरोधात एकसारखेच पुरावे कसे? सिंघवींचा सुप्रीम कोर्टात युक्तिवाद

Rahul Gandhi: राहुल गांधींनी रायबरेली निवडल्यानं निरुपम यांचा हल्लाबोल; म्हणाले, पळून गेले...

SRH vs RR, IPL 2024: 'भयानक अंपायरिंग...', हेडची बॅट हवेत होती असं सांगत माजी भारतीय क्रिकेटरने थर्ड अंपायरवर साधला निशाणा

SCROLL FOR NEXT