मुंबई

करंजाडेतील पाणीप्रश्न पेटला

CD

पनवेल, ता. १० (बातमीदार) : करंजाडेमधील सेक्टर ३, ४, ५ व ६ मध्ये गेल्या काही दिवसांपासून पाणीपुरवठा होत नाही. एकीकडे नागरिकांना पाण्यासाठी रात्रभर जागे राहावे लागत आहे; तर दुसरीकडे सिडको प्रशासनातर्फे सोसायट्यांना दोन ते तीन दिवसांनी एखादा टँकर दिला जात असल्याने रहिवाशांवर विकतचे पाणी घेण्याची वेळ आली आहे.
पनवेल परिसराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील साठा कमी झाला आहे. यामुळे पनवेल परिसरातील सिडको वसाहतींमध्ये सध्या पाणीटंचाईसदृश परिस्थिती आहे. करंजाडेतील काही सेक्टरमध्ये गेल्या काही दिवसांपासून पाणीपुरवठा विस्कळित झाला आहे. एमजेपीकडून पाणीपुरवठा कमी होत असल्याने त्याचा परिणाम सिडको वसाहतींमधील पाणीपुरवठ्यावर झाला आहे. त्यात सिडकोच्या जुन्या वाहिनीवरून पाणीपुरवठा बंद केल्यास कुंडे वहाळ आणि वरचे ओवळे या गावांचा प्रश्न निर्माण होत असल्याने सध्या उंचावर असलेल्या करंजाडे भागात तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे. अशातच अनेक घरांमध्ये लग्नसराई असल्याने घरात पाणी नसल्याने रहिवासी हवालदिल झाले आहेत.
---------------------------------------------
करंजाडे गावाला १७ एमएलडी पाणी लागते; पण सध्या कमी प्रमाणात पाणी मिळत आहे. नवीन जलवाहिनी सुरू झाल्यावर एमजेपीकडून २६ एमएलडी पाणी मिळाल्यानंतर हा प्रश्न सुटेल; पण त्यासाठी कुंडेवहाळ आणि वरचे ओवळे येथील जलवाहिनी बदलणे आवश्यक आहे.
- एन. सी. चोथाणी, कार्यकारी अभियंता, सिडको
----------------------------
सिडकोचे अधिकारी नवीन जलवाहिनीचे काम पूर्ण होऊन ही सुरू करण्यास घाबरत आहेत. त्यामुळे हा प्रश्न निर्माण झाला आहे. सेक्टर ६ हा उंचावर असल्याने तेथील सोसायट्यांना पाणी कमी दाबाने मिळते. त्यासाठी नवीन जलकुंभ किंवा त्यांना वेगळी वाहिनी देणे आवश्यक आहे.
- मंगेश शेलार, सरपंच, करंजाडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : लोकसभा मतदानाचा तिसरा टप्पा; कित्येक दिग्गजांचं भवितव्य आज ईव्हीएममध्ये होणार कैद

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 7 मे 2024

Loksabha Election 2024 : मतदानाचा आज तिसरा टप्पा; राज्यातील ११ मतदारसंघांमध्ये तयारी पूर्ण

Dr. Amol Kolhe : आढळराव पाटील शब्द पाळणार का?

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

SCROLL FOR NEXT