मुंबई

कल्याण पूर्वेत दुभाजकावर डंपर आदळला

CD

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. १० : शहरातील रस्त्यांवर डम्परचालक भरधाव वेगाने वाहन चालवीत असल्याने ते अपघाताला कारणीभूत ठरत आहेत. डोंबिवलीमध्ये डम्परचालकाच्या निष्काळजीपणामुळे एका पादचाऱ्याला आपला जीव गमवावा लागला होता. ही घटना ताजी असतानाच कल्याण पूर्वमध्ये एका डम्परचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने दुभाजकावर जाऊन डम्पर आदळल्याची घटना घडली आहे. यामध्ये कोणतीही हानी झाली नसली, तरी डम्परचालकांच्या वर्दळीच्या रस्त्यांवरील सुसाटपणाला वाहतूक, आरटीओ विभागाने आवर घालण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
काही दिवसांपूर्वी डोंबिवली पूर्वेतील डॉ. राजेंद्र प्रसाद रोडवर एका बांधकाम कंपनीच्या डम्परचालकाने निष्काळजीपणे डम्पर चालविल्याने एका ५५ वर्षांच्या पादचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला होता. दोन महिन्यांपूर्वी दत्तनगर भागात असाच प्रकार घडला होता. कल्याण, डोंबिवली परिसरात मोठ्या प्रमाणात बांधकामे सुरू आहेत. या बांधकामांसाठी सिमेंट, मिक्सर घेऊन येणारे डंपर चालक शहरातील मध्यवर्ती रस्त्यांवर गर्दीचा विचार न करता भरधाव वेगाने डम्पर चालवित आहेत. त्यामुळे अपघात घडत आहेत. हे प्रकार यापूर्वी झाले असताना सोमवारी सकाळी कल्याण पूर्वेतील मुख्य वर्दळीच्या रस्त्यावर विजयनगर भागात एका डम्परचालकाचे डम्परवरील नियंत्रण सुटले. चालकाने कौशल्याने डम्पर रस्तादुभाजकाला धडकवला; अन्यथा मोठी दुर्घटना या भागात घडली असती, असे येथील नागरिकांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : राज्यातील मतदारसंघांत कुठे रांगा, तर कुठे निरुत्साह

Loksabha Election 2024 : कासवगतीने कासावीस! मतदार चार तास रांगेत

Monsoon : पावसाचा जोर, केरळ ‘अलर्ट मोड’वर

BSP Party : बसपची अस्तित्वाची लढाई; मायावतींचा दबदबा झपाट्याने कमी होऊ लागला

Uddhav Thackeray : मतदान केंद्रात मतदारांकडे दोन ते तीन वेळा ओळखपत्र विचारून ‘जाणीवपूर्वक विलंब’

SCROLL FOR NEXT