मुंबई

उत्तुंग इमारतींच्या आगींवर नियंत्रण शक्य

CD

मुंबई, ता. १० ः मुंबईतील उत्तुंग इमारतीतील लागणाऱ्या आगीवर नियंत्रण आणण्यासाठी कम्प्रेस्ड एअर फोम सिस्टीमसह (सीएएफएस) हाय प्रेशर वॉटर मिस्ट प्रणालीचा वापर करण्यात येणार आहे. महापालिकेकडून त्यासाठी अद्ययावत ६५ उपकरणे खरेदी केली जात आहेत. या उपकरणांचा आगीच्या उगम पातळीवर अत्यंत प्रभावीपणे वापर करून आगीचा प्रसार रोखला जाईल, अशी माहिती अग्निशमन दलाने दिली.
आग लागल्यास व इमारतीमधील अंतर्गत अग्निशमन प्रणाली कार्यरत नसल्यास अग्निशमन दलास, पाणीपुरवठा करण्याकरिता पंपांचे जाळे तयार करावे लागते. हे जाळे तयार करण्यास काही वेळ लागतो आणि त्यामुळे आग पसरण्याची व त्यामुळे इमारतीमधील रहिवाशांच्या जीवास धोका निर्माण होण्याची शक्यता जास्त असते. त्याकरता अग्निशमन जवान आगीच्या वर्दीवर जाताना प्रथमोपचार किटप्रमाणे एक लहानशे व सहजरीत्या वाहून नेण्यास सोपे असे अग्निशमन उपकरण स्वतःसोबत घेऊन गेल्यास तात्काळ आगीवर त्याचा मारा करून उगम पातळीवर आगीवर नियंत्रण मिळविता येऊ शकते, अशी माहिती दलाने दिली. यासाठी तब्बल २.५५ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. पुढील तीन महिन्यांमध्ये ही उपकरणे अग्निशमन दलाच्या ताफ्यात जमा होणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Telangana CM Revanth Reddy : तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना दिल्ली पोलिसांचं समन्स; अमित शाहांच्या व्हिडीओचं प्रकरण

Sairat Complete 8 Years : मराठी सिनेमाला १०० कोटींचं स्वप्न दाखवणाऱ्या 'सैराट'ला ८ वर्षं पूर्ण; रिंकूची पोस्ट चर्चेत

Share Market Closing: शेअर बाजारात तुफान तेजी; सेन्सेक्स 900 अंकांच्या उसळीसह बंद, गुंतवणूकदार मालामाल

Latest Marathi News Live Update: अमित शहांच्या एडिटेड व्हिडिओ प्रकरणी तेलंगानाच्या मुख्यंत्र्यांना समन्स

Nashik News : मालेगावी भाजीपाल्याची आवक स्थिर! मे, जून महिन्यात उत्पादन घटण्याचा अंदाज

SCROLL FOR NEXT