मुंबई

रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक

CD

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १२ : उपनगरी रेल्वे मार्गांवरील रुळांची दुरुस्ती, तसेच सिग्नल यंत्रणेत काही तांत्रिक कामे करण्यासाठी रविवारी (ता. १४) रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या माटुंगा ते ठाणे अप आणि डाऊन धीम्या मार्गावर; तर हार्बर मार्गावरील पनवेल-वाशी अप आणि डाऊन मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. तसेच पश्चिम रेल्वेवर वसई रोड ते भाईंदर अप व डाऊन जलद मार्गावर रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येणार आहे.

मध्य रेल्वे
कुठे- माटुंगा-ठाणे अप आणि डाउन धिम्या मार्गावर
कधी- सकाळी ११.०५ ते दुपारी ४.०५ वाजेपर्यंत
परिणाम-
ब्लॉकदरम्यान सीएसएमटी येथून सुटणाऱ्या धीम्या मार्गावरील सेवा माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील. या सेवा शीव, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड आणि ठाणे या स्थानकांवर थांबून पुन्हा डाऊन धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. या सेवा गंतव्यस्थानी नियोजित वेळेच्या १५ मिनिटे उशिराने पोहोचेल; तर कल्याण येथून अप धीम्या मार्गावरील सेवा ठाणे आणि माटुंगादरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येतील. या सेवा ठाणे, मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला आणि शीव येथे थांबतील. पुढे अप धीम्या मार्गावर वळवण्यात येतील आणि १५ मिनिटे उशिराने गंतव्यस्थानावर पोहोचतील.

हार्बर रेल्वे
कुठे- पनवेल-वाशी अप आणि डाऊन मार्गावर
कधी- सकाळी ११.०५ ते सायंकाळी ४.०५ वाजेपर्यंत
परिणाम -
ब्लॉक कालावधीत पनवेल, बेलापूर येथून सीएसएमटीकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि सीएसएमटी येथून पनवेल, बेलापूरकडे जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील. पनवेल येथून ठाणेकरीता सुटणाऱ्या अप ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा आणि पनवेल येथून ठाणेकरीता सुटणाऱ्या डाऊन मार्गावरील सेवा रद्द राहतील. या ब्लॉक कालावधीत सीएसएमटी ते वाशीदरम्यान विशेष लोकल धावतील. ब्लॉक कालावधीत ठाणे-वाशी-नेरूळ स्थानकांदरम्यान ट्रान्सहार्बर लाईन सेवा उपलब्ध असेल.

पश्चिम रेल्वे
कुठे- वसई रोड ते भाईंदर अप-डाऊन जलद मार्गावर
कधी- शनिवारी रात्री ११.३० ते रविवारी पहाटे ४.४५ वाजेपर्यंत
परिणाम -
ब्लॉकदरम्यान अप-डाऊन जलद मार्गावरील लोकल सेवा भाईंदर ते बोरिवली स्थानकादरम्यान धीम्या मार्गावर वळविण्यात येणार आहेत. बोरिवलीहून सुटणाऱ्या काही लोकल गाड्या ब्लॉकदरम्यान रद्द असणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MS Dhoni IPL 2024 : 'धोनीला 9व्या क्रमांकावर बॅटिंग करायची असेल तर त्याने खेळू नये...', चेन्नईच्या थालावर भडकला MI चा माजी कप्तान

Latest Marathi News Update : गाझियाबादमध्ये अग्नितांडव, अग्निशमन दलाच्या 18 गाड्या घटनास्थळी हजर

Bajrang Punia : नाडाकडून बजरंग पुनिया निलंबित नमुना; चाचणीला नकार,कुस्ती संघटना ‘वाडा’शी संपर्क साधणार

Aerobic Exercise : वजन कमी करण्यासाठी घरच्या घरी करा ‘हे’ एरोबिक व्यायाम प्रकार, मानसिक अन् शारिरीक आरोग्य राहील तंदूरूस्त

Pune News : क्रिकेटच्या चेंडूने घेतला होतकरू खेळाडूचा बळी! अवघड जागी चेंडू लागल्यामुळे ११ वर्षांच्या मुलाचा मृत्यु

SCROLL FOR NEXT