मुंबई

आत्महत्या रोखण्यासाठी पोलिसांचा उपक्रम

CD

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. १३ : आत्महत्या रोखण्यासाठी मुंबई पोलिस दलातील एका महिला सहाय्यक पोलिस आयुक्तांनी अनोखा उपक्रम हाती घेतला आहे. सहाय्यक पोलिस आयुक्त सुरेखा कपिले यांनी हा अनोखा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमाचा भाग म्हणून परिसरात जनजागृती अभियान राबवण्यात येत आहे. पूर्व उपनगरातील भांडुप, कांजूरमार्ग आणि विक्रोळी परिसरात या उपक्रमाला सुरुवात करण्यात आली असून भविष्यात संपूर्ण मुंबईत अशाप्रकारे जनजागृती मोहीम राबवण्याचा विचार आहे.

भांडुप विभागात कार्यरत असलेल्या सहाय्यक आयुक्त सुरेखा कपिले यांच्या कार्यक्षेत्रात काही महिन्यांपासून आत्महत्या करणाऱ्यांची संख्या वाढल्याचे निदर्शनास आले. क्षुल्लक कारणांवरून आत्महत्या करण्यात येत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे आत्महत्या रोखण्यासाठी परिसरात जनजागृती अभियान राबवण्याचा निर्णय त्यांनी घेतला. मानसिकदृष्ट्या खच्चीकरण, कौटुंबिक वाद अथवा बेताची आर्थिक परिस्थिती आदी विविध कारणांमुळे गेल्या काही वर्षांत आत्महत्या करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. आत्महत्या करणाऱ्यांमध्ये महिला आणि पुरुषांबरोबरच लहान मुलांची संख्या मोठी असून दिवसेंदिवस ही संख्या वाढतच आहे.

सामाजिक संस्थांची मदत
सहाय्यक पोलिस आयुक्त सुरेखा कपिले यांनी काही सामाजिक संस्थांच्या मदतीने विक्रोळी, भांडुप आणि कांजूरमार्ग परिसरात ‘जागर’ अभियानाअंतर्गत जनजागृती मोहीम हाती घेतली. या मोहिमेत पोलिस आणि सामाजिक संस्थेचे कार्यकर्ते चौक सभा घेऊन नागरिकांशी संवाद साधत आहेत. मानसिक तणावाखाली असलेल्या व्यक्तींचे तज्ज्ञ समुपदेशकांच्या माध्यमातून समुपदेशन करण्यात येत आहे. गेल्या महिनाभरात पूर्व उपनगरातील विविध भागांत अनेक चौक सभा घेण्यात आल्या आहेत. त्यांना चांगला प्रतिसाद मिळत असून भविष्यात संपूर्ण मुंबईत हा उपक्रम राबवून मानसिकदृष्ट्या खचलेल्या नागरिकांना नवीन दिशा देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सुरेखा कपिले यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT