मुंबई

गृहनिर्माण सहकारी संस्थांची आज मुंबईत परिषद

CD

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १३ : मुंबईतील सहकारी गृहनिर्माण संस्थांची एकदिवसीय परिषद मुंबईतील गोरेगाव नेस्को सेंटर येथे आयोजित करण्यात आली आहे.
भाजप विधान परिषद गटनेते आणि मुंबई जिल्हा बँकेचे अध्यक्ष आमदार प्रवीण दरेकर यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी (ता. १४) ही परिषद होईल.
या परिषदेचे उद्‍घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते, तर समारोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. विशेष म्हणजे या परिषदेत गृहनिर्माण सहकारी संस्थांच्या मागण्यांबाबत शासनाकडून महत्त्वाच्या घोषणा केल्या जाणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येते आहे. स्वयंपुनर्विकास व पुनर्विकासातील अडचणी सोडवण्यासंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे नुकतीच बैठक पार पडली. या बैठकीत अनेक विषयांवर सकारात्मक चर्चा होऊन मागण्यांची पूर्तता करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी संबंधित विभागांना दिले होते. त्यानुसार उद्याच्या सहकार परिषदेत या मागण्यांच्या पूर्ततेबाबत घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच सहकारी गृहनिर्माण स्वयंपुनर्विकासासंदर्भात विविध मागण्या या सहकार परिषदेत मांडण्यात येणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bhavesh Gupta:'पेटीएम'च्या अध्यक्षांचा कंपनीला रामराम, तडकाफडकी घेतला करिअर ब्रेकचा निर्णय

Ganesh Naik: आम्हाला प्रेमाने दिलेला आदेश आवडतो, तंबी देणारा जन्मलेला नाही

IPL 2024 LSG vs KKR : ४८ तासांच्या आत कोलकता पुन्हा मैदानात! लखनौ सुपर जायंटस् विरुद्ध आज सामना

Poonch Attack: 30 महिने... सहावा हल्ला अन् 21 जवानांचे बलिदान; भारतीय लष्कर सतत ठरत आहे दहशतवाद्यांचे टार्गेट

Latest Marathi News Live Update : सुनेत्रा पवार यांच्यासाठी अजित पवार यांची सांगता सभा

SCROLL FOR NEXT