मुंबई

कोकणच्या प्रवेशद्वारावर प्रवाशांची कोंडी

CD

नवीन पनवेल, ता.१५(वार्ताहर)ः सुट्ट्या, लग्नसराई सुरू असल्यामुळे पनवेल आगारावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांची संख्या वाढली आहे. त्यात महिलांना तिकिटात मिळालेली सूट तसेच ज्येष्ठांना अमृत योजने अंतर्गत असलेली प्रवासाची मुभा एसटीच्या पथ्यावर पडली असल्याने आगारांमध्ये प्रवाशांची तोबा गर्दी होत असल्याचे चित्र आहे.
पनवेल आगारातून घाटमाथ्यावर तसेच कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. मुंबई, बोरिवली, पालघर व ठाणेमधून येणाऱ्या गाड्यांना कोकणचा प्रवेशद्वार असलेला पनवेल हा थांबा आहे. त्यामुळे सुट्ट्या आणि लग्नसराईनिमित्त गावाकडे जाणाऱ्यांसाठी पनवेल एसटी स्थानक हा उत्तम पर्याय आहे. अशातच राज्य सरकारने महिला सन्मान योजना, अमृत महोत्सवी योजना सुरू केल्यामुळे महिलांचा एसटीने प्रवास करण्याकडे ओढा वाढलेला आहे. त्यामुळे एसटीच्या उत्पन्नामध्ये भरघोस वाढ झाली असून पनवेल आगारात सर्वसाधारणपणे दररोज दोन ते अडीच हजार प्रवासी वाढले असल्याची माहिती आगार व्यवस्थापक सुजित डोळस यांनी दिली आहे.
----------------------------------
ग्रामीण भागातील फेऱ्यांवर परिणाम
निर्गमित ठिकाणाहून निघणाऱ्या गाड्या भरून येत असल्याने पनवेलमधील प्रवाशांना आरक्षण नसल्याने गाडीत जागा भेटत नाही. त्यामुळेच पनवेल आगारातून विविध मार्गांवर जादा गाडी सोडावी लागत आहे. सध्या पनवेलमधून घाटमाथा तसेच कोकणासाठी गाड्या सोडण्यात येत आहेत. त्यात सातारा, पुणे, कराड व महाड या ठिकाणी गाड्या सोडण्यात आल्या असल्याने या सुविधेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. पण त्यामुळे ग्रामीण भागातील फेऱ्यांवर परिणाम झाला असल्याने प्रवाशांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
--------------------------------------
पनवेल आगारातून बस फेऱ्यांचे योग्य नियोजन होत आहे. परंतु, आगारातून गाडी सुटताना प्रवाशांनी स्वयंशिस्तीने गाडीत चढले पाहिजे. जेणेकरून गर्दी होणार नाही. तसेच चोरीच्या प्रकारांना आळा बसेल.
-सुजीत डोळस, आगार व्यवस्थापक, पनवेल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'पवित्र ग्रंथ गुरु साहिब'ची पानं गुरुद्वारात घुसून फाडली! जमावाच्या बेदम मारहाणीत तरुणाचा मृत्यू

Nick Jonas: देसी गर्ल प्रियांका चोप्राचा पती निक जोनासची तब्येत बिघडली; व्हिडीओ शेअर करत म्हणाला...

Job Discrimination : मुंबईत नोकरी, पण मराठी माणसालाच नो एन्ट्री? लिंक्डइनवरील पोस्ट होतेय व्हायरल

Samruddhi Accident: समृद्धी महामार्गावरील अपघात कधी थांबणार? कारला मागून धडक दिल्याने तिघांचा मृत्यू

Bhavesh Gupta:'पेटीएम'च्या अध्यक्षांचा कंपनीला रामराम, तडकाफडकी घेतला करिअर ब्रेकचा निर्णय

SCROLL FOR NEXT