मुंबई

अवैध खासगी वाहतुकीची डोकेदुखी

CD

कामोठे, ता. १८ (बातमीदार) : टप्पा प्रवासी वाहतुकीला सर्वत्र बंदी असताना पनवेल एसटी स्थानकाबाहेर खासगी वाहतूकदार राजरोसपणे अवैधरित्या वाहतूक करत आहेत. यात प्रवाशांकडून दुप्पट तिप्पट भाडे आकारले जात आहेत. एसटी आरक्षण मिळत नसल्याने प्रवाशांना अशा खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत असतो. यात अवैध खासगी प्रवासी वाहतुकीमुळे काही प्रमाणात एसटी महामंडळालाही तोटा सहन करावा लागत आहे. अनेक ठिकाणी तर अशा खासगी वाहतुकीमुळे वाहतूक कोंडीलाही सामोरे जावे लागत आहे.
कोकणच्या प्रवेशद्वारावरील पनवेल एसटी स्थानक प्रवासी वाहतुकीचे व्यस्त ठिकाण आहे. या स्थानकातून कोकणात, घाटमाट्यावर, मुंबई उपनगरात; तसेच स्थानिक भागात दिवसाला एसटी बसच्या सुमारे दोन हजार फेऱ्या होत असतात. उन्हाळ्याच्या सुट्टीत, सणासुदीच्या दिवसांत बसच्या फेऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होते. अशा वेळी पनवेल एसटी स्थानकाचे मासिक उत्पन्न साधारण दोन कोटींच्या घरात पोहचते. सद्यस्थितीत उन्हाळी सुट्टीमुळे गावाकडे जाणाऱ्यांची संख्या वाढली आहे. पनवेल एसटी स्थानकात तिकीट आरक्षित करणाऱ्या खिडकीवर नागरिकांच्या लांबलचक रांगा लागत आहेत. तिकीट आरक्षित न झालेल्या प्रवाशांना नाईलाजाने खासगी वाहनातून प्रवास करावा लागत आहे. एसटी स्थानकाबाहेर महाड, पोलादपूर, श्रीवर्धन, म्हसळा या भागांत प्रवासी वाहतूक करणारी अनेक खासगी वाहने उभी असतात. या खासगी वाहनांतून दुप्पट, तिप्पट दराने प्रवासी वाहतूक केली जात आहे.
पनवेल स्थानक प्रशासनाने उपप्रादेशिक परिवहन विभागाला अवैधरित्या प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. पनवेल एसटी स्थानकात पोलिस यंत्रणेच्या अभावामुळे गर्दीच्या वेळी पाकिटमार, चोऱ्या करणाऱ्या लोकांचे फावत असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

वाहतूक कोंडीत भर
सायन-पनवेल महामार्गावरील खारघर, कळंबोली, पनवेल येथे राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बस थांब्यापासून दोनशे मीटर अलीकडे, पलीकडे खासगी वाहनांना टप्पा प्रवासी वाहतुकीस बंदी आहे. मात्र, खासगी वाहतूकदार नियम धाब्यावर बसवून वाहने उभी करतात. यामुळे या ठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे.

अवैध प्रवासी वाहतूक रोखण्यासाठी खारघर, कळंबोली, पनवेल येथे सातत्याने कारवाई केली जात आहे. कळंबोली मॅकडोनाल्ड परिसरात नुकतीच कारवाई केली आहे. पनवेल एसटी स्थानक परिसरातील अवैध प्रवासी वाहतुकीवर कारवाई केली जाणार आहे.
- गजानन ठोंबरे, सहायक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पनवेल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Squad for T20 WC: केएल राहुलची टी20 कारकीर्द संपुष्टात? 'या' पाच खेळाडूंचीही संधी हुकली

Arvind Kejriwal: केजरीवालांना निवडणुकीपूर्वीच अटक का केली? सुप्रीम कोर्टानं ईडीकडून मागवलं उत्तर

Vishal Patil: विश्वजीत कदमच आमचे नेते त्यांना मुख्यमंत्री करणारच, विशाल पाटलांनी सांगितला विजयानंतरचा प्लॅन

Amit Shah Fake Video Case : अमित शाह फेक व्हिडीओ प्रकरणात १६ नेत्यांना नोटीस, सात राज्यांमध्ये पोलिस पोहोचले

Shahrukh Khan : शाहरुखवर अबराम भडकला ; सोशल मीडियावर व्हिडीओ चर्चेत

SCROLL FOR NEXT