मुंबई

मिरा-भाईंदरमधील सर्व शाळा ‘पास’

CD

भाईंदर, ता. १७ (बातमीदार) : मिरा-भाईंदर शहरात एकही शाळा अनधिकृत नसल्याची माहिती महापालिकेच्या शिक्षण विभागाने दिली आहे. गेल्या वर्षी सात शाळा अनधिकृत घोषित करण्यात आल्या होत्या. या शाळा बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे शहरात एकही अनधिकृत शाळा नाही, असा दावा शिक्षण विभागाने केला आहे.

अनधिकृत शाळा शोधून काढण्याची जबाबदारी शिक्षण विभागाने नियुक्त केलेल्या केंद्र प्रमुखांना देण्यात आली होती. या केंद्र प्रमुखांनी त्यांच्या विभागात अनधिकृत शाळा नसल्याचा अहवाल शिक्षण विभागाकडे सादर केला. गेल्या वर्षी सात शाळा अनधिकृत असल्याचे जाहीर करण्यात आले होते. या शाळांबाहेर महापालिकेने फलक लावून पाल्यांना शाळेत प्रवेश देऊ नये, असे आवाहन केले होते. तसेच शाळा तातडीने बंद करण्याच्या नोटिसा संबंधित शैक्षणिक संस्थांना देण्यात आल्या होत्या. या वर्षी शिक्षण विभागाने नागरिकांनाही त्यांच्या परिसरात अनधिकृत शाळा असेल तर त्याची माहिती कळवण्याचे आवाहन केले होते; परंतु अद्याप अनधिकृत शाळांबाबत कोणतीही माहिती आली नसल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.

गेल्या वर्षी चार शाळा बंद
चार शाळा गेल्या वर्षीच बंद करण्यात आल्या, तर दोन शाळा सुरू राहिल्याने त्यांच्याकडून प्रत्येकी एक लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. या दोन शाळांनी शिक्षण विभागाकडून परवानगी आणणार असल्याचे महापालिकेला कळवले होते; परंतु वर्षभरात शिक्षण विभागाकडून परवानगी न मिळाल्याने या वर्षीपासून शाळा बंद करण्यात आल्याचे पत्र या दोन शाळांनी या वर्षी महापालिकेला दिले, तर उर्वरित एका शाळेला केंद्रीय शिक्षण मंडळाची परवानगी मिळाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT Live Score: बेंगळुरूचे गोलंदाज चमकले! चिन्नास्वामी स्टेडियमवर गुजरातला 147 धावांवरच केलं ऑलआऊट

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

Weather Update : पुण्यात उन्हाचा चटका कायम राहणार; राज्यात वादळी पावसाला पोषक वातावरण

Lok Sabha Election 2024 : ४०० पार घोषणा, पण भाजप अडीचशे जागांवर अडकणार

Latest Marathi News Live Update: नारायण राणेंकडे प्रश्न सोडवण्याची हातोटी- राज ठाकरे

SCROLL FOR NEXT