मुंबई

कामोठेत आठ बांगलादेशी घुसखोर अटकेत

CD

पनवेल, ता. १८ (वार्ताहर) : कामोठे, सेक्टर -२२ मधील मैदानालगतच्या चाळीत बेकायदा वास्तव्यास असलेल्या आठ बांगलादेशी नागरिकांना अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने अटक केली. या कारवाईत चार पुरुष व चार महिलांना अटक करण्यात आली आहे. हे सर्व बांगलादेशी नागरिक बांधकाम साईटवर मजुरी करून तसेच घरकाम करून राहत असल्याचे तपासात आढळून आले आहे. अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अतुल आहेर यांच्या सूचनेनुसार सहायक पोलिस निरीक्षक नीलम पवार व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली. या वेळी इरशाद तोहित मुली (वय ४०), रेश्मा इरशाद तोहीत मुल्ली (वय २२), जुनुअल मालीक इस्लम (वय ४८), पिंकी जुनुअल मालीक इस्लम (वय ३६), कोकान मनीक शेख (वय ३२), शोभाबेगम कोकान मनीक शेख (वय ३०), अनिकुल आलम समसुल आलम (वय ३४) व कविता खातुन जियाजु शेख (वय २८) आदी बेकायदा वास्तव्यास असल्याचे आढळून आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, RCB vs CSK: चेन्नईचा 17 व्या हंगामातील प्रवास थांबला! धोनीचीही कारकिर्द संपली? सामन्यानंतरचा पाहा Video

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

IPL 2024: RCB चा आनंद गगनात मावेना! प्लेऑफमध्ये पोहचताच केला जोरदार जल्लोष, पाहा Video

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

SCROLL FOR NEXT