मुंबई

ठाण्यात आज ‘महिला आयोग आपल्या दारी’

CD

ठाणे, ता. २२ : महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडून ‘महिला आयोग आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत ठाणे जिल्ह्यातील तक्रारींची जनसुनावणी मंगळवार २३ मे रोजी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी १०.३० वाजता होणार असून आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर आणि आयोगाच्या सदस्या या स्वतः तक्रारींची सुनावणी घेणार आहेत. ठाणे जिल्ह्यात होणाऱ्या या जनसुनावणीत अधिकाधिक महिलांनी पुढे येऊन, न घाबरता आपल्या तक्रारी यावेळी मांडाव्यात, असे आवाहन आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी केले आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती रूपाली चाकणकर २३ मे रोजी ठाणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांच्या उपस्थितीत जनसुनावणी होणार आहे. त्यानंतर ठाणे जिल्ह्याची आढावा बैठक होईल. यावेळी जिल्हाधिकारी, कामगार आयुक्त, पोलिस अधीक्षक तसेच आरोग्य, परिवहन, शिक्षण विभागाचे अधिकारी उपस्थित असतील. जिल्हा दौरा दरम्यान वन स्टॉप सेंटर तसेच महिला वसतिगृहास ही आयोगाच्या अध्यक्षा व सदस्या भेट देणार आहेत. तसेच या जनसुनावणीला पोलिस, प्रशासन, विधी सल्लागार, समुपदेशक, जिल्हा समन्वयक उपस्थित राहणार आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : राज्यातील मतदारसंघांत कुठे रांगा, तर कुठे निरुत्साह

Loksabha Election 2024 : कासवगतीने कासावीस! मतदार चार तास रांगेत

Monsoon : पावसाचा जोर, केरळ ‘अलर्ट मोड’वर

BSP Party : बसपची अस्तित्वाची लढाई; मायावतींचा दबदबा झपाट्याने कमी होऊ लागला

Uddhav Thackeray : मतदान केंद्रात मतदारांकडे दोन ते तीन वेळा ओळखपत्र विचारून ‘जाणीवपूर्वक विलंब’

SCROLL FOR NEXT