मुंबई

खूनाचा डाव साधण्याआधीच पडल्या बेड्या

CD

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. २० : डोंबिवली पूर्वेतील पांडुरंग वाडी येथे गावठी पिस्तूल विकण्यासाठी आलेल्या परशुराम करवले (वय २३) याला मानपाडा पोलिसांनी अटक केली आहे. त्याने आणखी एक गावठी पिस्तूल सातारा येथील अक्षय जाधव याला विक्री केले असल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी सातारा येथे जाऊन अक्षय याला अटक केली. अक्षयने भाऊबंदकीत वाद असल्याने एकाचा काटा काढण्यासाठी परशुराम याच्याकडून पिस्तूल खरेदी केले होते. त्याने खुनाचा डाव साधण्याआधीच त्याच्या हाती मानपाडा पोलिसांच्या बेड्या पडल्या आहेत.
मानपाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत पांडुरंग वाडी येथील चंद्रहास हॉटेल परिसरात एक व्यक्ती पिस्तूलविक्रीसाठी येणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक शेखर बागडे यांना मिळाली होती. डोंबिवलीचे सहायक पोलिस आयुक्त सुनील कुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली बागडे यांनी सहायक पोलिस निरीक्षक अविनाश वनवे, पोलिस हवालदार राजकुमार खिलारे, दीपक गडगे, संजू मासाळ, प्रवीण किनरे, यलप्पा पाटील यांच्या पथकाची नेमणूक केली. त्यांनी सापळा रचत परशुराम याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे पोलिसांना एक गावठी पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे सापडली. त्याच्याकडे आणखी चौकशी केली असता त्याने एक गावठी बनावटीचे पिस्तूल सातारा येतील अक्षय जाधव याला विक्री केल्याचे सांगितले. पोलिसांनी लागलीच सातारा येथील खटाव तालुक्यातून अक्षयला ताब्यात घेतले. अक्षयकडे गावठी पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे आढळून आली.


-----------------
भाऊबंदकीमध्ये काटा काढण्याचा डाव
अक्षय जाधव याच्याकडे पोलिसांनी चौकशी केली असता त्याचा त्याच्या गावी भाऊबंदकीमध्ये वाद झाला होता. व्यवसायावरून हा वाद झाल्याने त्याने भाऊबंदकीमधील एकाचा काटा काढण्याचा डाव रचला होता. त्यासाठी त्याने परशुराम याच्याकडून पिस्तूलदेखील खरेदी केले होते; परंतु त्याने डाव साधण्याआधीच पोलिसांच्या बेड्या त्याच्या हातात पडल्या आहेत. परशुराम याने अक्षय याला ४० हजार रुपये किमतीला गावठी पिस्तूलची विक्री केली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT