मुंबई

प्लॉट-घरे विकत देण्याच्या बहाण्याने फसवणूक

CD

नवी मुंबई, ता. २० (वार्ताहर) : उरण भागात प्लॉट-घरे विक्री करण्याच्या बहाण्याने सर्वसामान्य लोकांकडून लाखो रुपये उकळून त्यांना प्लॉट अथवा घर न देता त्यांची फसवणूक करणाऱ्या महालँड कंपनी व मालकाविरोधात अखेर सीबीडी पोलिस ठाण्यात फसवणुकीसह अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात आतापर्यंत ३७ ग्राहकांनी कंपनीविरोधात तक्रार दाखल केली असली तरी या कंपनीकडून फसवणूक झालेल्यांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. नवी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून या प्रकरणाच्या तपासाला सुरुवात करण्यात आली आहे.
महालॅंड कंपनीने २०१८ मध्ये उरणच्या रांजणपाडा परिसरातील चिरनेर, विंधणे व धाकटी जुई या भागात एक अथवा त्यापेक्षा जास्त गुंठ्यांचे प्लॉट, तसेच महालँड कंपनीच्या माय होम ड्रिम होम योजनेअंतर्गत फ्लॅटच्या विक्रीबाबत वेगवेगळ्या माध्यमातून जाहिरातबाजी केली होती. या जाहिरातीला भुलून शेकडो ग्राहकांनी महालँड कंपनीमध्ये लाखो रुपये भरून प्लॉट-फ्लॅटचे बुकिंग केले होते. महालँड कंपनीकडून फसवणूक झाल्याचे लक्षात येताच सर्व ग्राहकांनी मनसेकडे तक्रार केली होती. त्यानंतर मनसेचे जुईनगर विभाग अध्यक्ष अक्षय भोसले यांनी नवी मुंबईचे पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे यांची भेट घेऊन महालँड कंपनीने ३७ गुंतवणूकदारांची ९४ लाख ७४ हजारांची फसवणूक केल्याची बाब त्यांच्या निदर्शनास आणली. त्यानंतर आर्थिक गुन्हे शाखा युनिट-१ ने महालँड कंपनीचे मालक पंडित राठोड याच्याविरोधात सीबीडी-बेलापूर पोलिस ठाण्यात फसवणुकीसह अपहाराचा गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Telangana CM Revanth Reddy : तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना दिल्ली पोलिसांचं समन्स; अमित शाहांच्या व्हिडीओचं प्रकरण

Sairat Complete 8 Years : मराठी सिनेमाला १०० कोटींचं स्वप्न दाखवणाऱ्या 'सैराट'ला ८ वर्षं पूर्ण; रिंकूची पोस्ट चर्चेत

Share Market Closing: शेअर बाजारात तुफान तेजी; सेन्सेक्स 900 अंकांच्या उसळीसह बंद, गुंतवणूकदार मालामाल

Latest Marathi News Live Update: अमित शहांच्या एडिटेड व्हिडिओ प्रकरणी तेलंगानाच्या मुख्यंत्र्यांना समन्स

Nashik News : मालेगावी भाजीपाल्याची आवक स्थिर! मे, जून महिन्यात उत्पादन घटण्याचा अंदाज

SCROLL FOR NEXT