मुंबई

कचरा संकलनाचे तीनतेरा

CD

वाशी, ता. २३ (बातमीदार) ः नवी मुंबई महापालिकेने शहरातील पदपथांवर टाकण्यात येणाऱ्या कचऱ्यासाठी लिटल बिन्सची सुविधा दिली आहे. काही ठिकाणी या लिटल बिन्स चोरील्या गेल्या आहेत; तर काही ठिकाणी कचराकुंड्या हटवण्यात आल्या असल्याने घरातील कचरा टाकण्यासाठी या बिन्सचा वापर केला जात आहे. त्यामुळे स्वच्छ सर्वेक्षणाच्या मूळ उद्देशालाच हरताळ फासला गेला आहे.
पालिकेने स्वच्छ सर्वेक्षण २०२३ मध्ये नवी मुंबई शहर स्वच्छ राहावे, यासाठी पालिकेने विविध योजना राबवल्या आहेत. सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या कचऱ्याच्या संकलनासाठी शहरात ५०० पेक्षा अधिक लिटल बिन्स बसवल्या आहेत. अशातच पालिकेने कचराकुंडीमुक्त शहर बनवण्याचा निर्णय घेतला असल्याने शहरातील कचराकुंड्या हटवण्यात आल्या आहेत. त्यामुळे घरातील कचरा टाकण्यासाठी आता लिटल बिन्सचा वापर केला जात आहे. त्यामुळे लाखो रुपये खर्च करून बसवलेल्या लिटल बिन्सच्या मूळ उद्देशालाच हरताळ फासला गेला आहे.
--------------------------------------------
स्वच्छ नवी मुंबईतील अडथळे
- प्रवास करणाऱ्या नागरिकांनी रस्त्यांवर कचरा टाकू नये, म्हणून शहरामध्ये पालिकेने लिटल बिन्स बसवल्या आहे. अशातच शहराला कचराकुंडी मुक्त करण्यासाठी पालिकेने कुंड्या हटवल्याने अनेक ठिकाणी रस्त्यांवरच कचरा टाकला जात आहे.
- नवी मुंबई महापालिकने बसवलेल्या लिटल बिन्सची गुर्दल्ल्यांकडून चोरी केली जात आहे; तर सार्वजनिक ठिकाणी कचरा होऊ नये, यासाठी बसवलेले लिटल बिन्स घरातील कचऱ्यासाठी वापरले जात आहेत.
--------------------------------------
नवी मुंबई महापालिकेच्या स्वच्छ सर्वेक्षणामध्ये प्रथम क्रमांकासाठी पालिका प्रयत्न करत आहे. नवी मुंबई शहरातील नागरिकांचे सहकार्य यासाठी अपेक्षित आहे. घरातील कचरा कचरा गाडीमध्येच टाकावा.
- बाबासाहेब रांजळे, उपायुक्त, घनकचरा व्यवस्थापन

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH Live Score: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT