मुंबई

एसटी बँकेच्या निवडणुकीचे वातावरण तापले

CD

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २२ ः गेल्या वर्षभरापासून रखडलेली स्टेट ट्रान्सपोर्ट को-आॅपरेटिव्ह बँकेच्या निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्थेने निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केली असून २४ मेपर्यंत उमेदवारी अर्ज घेऊन निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सादर करता येणार आहे. त्यामुळे एसटी महामंडळातील कर्मचारी संघटना कामाला लागल्या असून २४ मेनंतर संघटनांचे पॅनल ठरणार आहे.
बँकेच्या एकूण १९ संचालकांसाठी ही निवडणूक होणार आहे. त्यामध्ये सर्वसाधारण १४, महिला प्रतिनिधी २, अनुसूचित जाती आणि जमाती प्रतिनिधी १, इतर मागास प्रतिनिधी १, भटक्या विमुक्त जाती/जमाती विशेष मागास प्रवर्गात प्रतिनिधी १ अशा १९ संचालकांसाठी निवडणूक रंगात येणार आहे. गेल्या पाच वर्ष एसटी महामंडळातील मान्यता प्राप्त असलेल्या महाराष्ट्र राज्य एसटी कामगार संघटनेची बँकेवर सत्ता होती. तब्बल १९ संचालक एसटी कामगार संघटनेने निवडून आणले होते. त्यानंतर आता बँकेवर सत्ता मिळवण्यासाठी विविध संघटनांच्या पॅनेलमध्ये चुरस निर्माण झाली आहे.
...
असा असेल कार्यक्रम
उमेदवारी अर्ज २४ पर्यंत सादर केल्यानंतर २५ मे रोजी उमेदवारी अर्जाची छाननी होणार आहे. वैध उमेदवारी अर्जांची २६ मे रोजी यादी लावण्यात येणार आहे. २६ मे ते ९ जूनपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे. १२ जूनला चिन्ह वाटप केले जाणार आहे. २३ जूनला सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत मतदान होणार असून २५ जूनला मतमोजणी करून निकाल जाहीर केला जाणार आहे. एसटी बँकेचे राज्यभरात ५२ शाखा असून, ९७ हजार सभासद या निवडणुकीत मतदान करणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT