मुंबई

रस्‍त्‍यासाठी सुरेश लाड यांचे आंदोलन

CD

नेरळ, ता. २३ (बातमीदार) ः कर्जत नगरपरिषदेतील दहिवली येथे तातेरे फ्लोरेसकडून इंजिनिअरिंग महाविद्यालयाकडे जाणारा रस्ता अनेक दिवसांपासून बंद आहे. या भागात काही शेतकऱ्यांसह माजी आमदार सुरेश लाड यांचीही शेती असल्याने रस्‍त्‍याच्या दुरवस्‍थेमुळे अडचणींचा सामना करावा लागतो. अपूर्ण कामामुळे अनेक दुचाकीस्‍वारांना तोल जाऊन दुखापत झाली आहे. याकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी माजी आमदार सुरेश लाड यांनी कर्जत नगरपरिषदेच्या पायऱ्यांवर बसून आंदोलन केले. लाड यांच्या आंदोलनानंतर काही वेळात रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली.
दहिवली येथील तातेर फ्लोरेसकडून इंजिनिअरिंग महाविद्यालयाकडे जाणारा रस्त्याला २८ ऑक्टोबर २०२२ रोजी तांत्रिक मान्यता मिळाली. यासाठी एमएमआरडीएकडून चार कोटी ६३ लाख ९३ हजार ६९८ निधी मंजूर झाला आहे. हा रस्ता सिमेंट काँक्रिटचा करण्यात येणार असून रचना कन्स्ट्रक्शनला काम दिले आहे. कामाचा ठराव स्थायी समितीकडून १ मार्च २०२३ रोजी घेतला होता. मात्र दोन महिन्यात रस्‍त्‍यावर केवळ खडी टाकण्यात आली आहे. त्यामुळे महाविद्यालयातील विद्यार्थी, स्‍थानिक रहिवासी तसेच शेतकऱ्यांना या खडीवरून जावे लागते. दुचाकीचा तोल गेल्‍याने अनेकजण जखमीही झाले आहेत. तक्रार करूनही ठेकेदाराकडून दुर्लक्ष होत असल्‍याचे नागरिकांचे म्‍हणणे आहे. रस्‍त्‍याच्या कामात होत असलेल्‍या विलंबाबाबत सुरेश लाड यांनी प्रशासनाला जाब विचारला, त्‍यानंतरही योग्‍य उत्‌तर न मिळाल्‍याने थेट कर्जत नगरपरिषदेच्या पायरीवर बसून आंदोलनाचा पवित्रा घेतला.

काही तासांत कामाला सुरुवात
लाड यांच्या आंदोलनामुळे नगरपरिषद प्रशासन खडबडून जागे झाले. त्‍यांनी त्‍वरित रस्‍त्‍याचे काम सुरू करणार असल्‍याचे आश्वासन देऊन लाड यांना सन्मानपूर्वक घरी पाठवले. त्यानंतर काही तासांत दहिवलीतील रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Telangana CM Revanth Reddy : तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना दिल्ली पोलिसांचं समन्स; अमित शाहांच्या व्हिडीओचं प्रकरण

Sairat Complete 8 Years : मराठी सिनेमाला १०० कोटींचं स्वप्न दाखवणाऱ्या 'सैराट'ला ८ वर्षं पूर्ण; रिंकूची पोस्ट चर्चेत

Share Market Closing: शेअर बाजारात तुफान तेजी; सेन्सेक्स 900 अंकांच्या उसळीसह बंद, गुंतवणूकदार मालामाल

Latest Marathi News Live Update: सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरणी तीन आरोपींना पोलीस कोठडी तर एकाला न्यायालयीन कोठडी

Nashik News : मालेगावी भाजीपाल्याची आवक स्थिर! मे, जून महिन्यात उत्पादन घटण्याचा अंदाज

SCROLL FOR NEXT