मुंबई

ग्रामीण भागातील तरुणांचा पोलिस भरतीत झेंडा

CD

किन्हवली, ता. २७ (बातमीदार) : ग्रामीण भागातील तरुणांनाही पोलिस दलात संधी मिळावी, यासाठी विविध उपक्रम स्थानिक स्तरावर राबवण्यात येत आहेत. अशातच किन्हवली येथे दहा वर्षांपासून ग्रामीण भागातील युवकांना पोलिस भरतीपूर्व प्रशिक्षण देणाऱ्या संघर्ष अकादमीच्या १३२ जणांची यंदाच्या पोलिस भरती प्रक्रियेत निवड झाली आहे.
किन्हवलीसारख्या ग्रामीण भागात तरुणांना पोलिस भरती, सैन्य दल, अग्निवीर, अग्निशमन दल अशा विविध क्षेत्रांत संधी मिळावी यासाठी ‘ना नफा ना तोटा’ या तत्त्वावर संघर्ष अकदामी स्थापन करण्यात आली. नुकत्याच झालेल्या पोलिस भरतीत वेगवेगळ्या विभागांत दोनशेपेक्षा अधिक युवक-युवतींनी आपले नशीब आजमावले आहे. यात महाराष्ट्र पोलिस दलात १३२ जणांची भरती झाली असून लोहमार्ग पोलिस, सैन्य दल, अग्निवीर, अग्निशमन दल अशा विभागांत विविध ठिकाणी ७२ युवक-युवती प्रशिक्षणार्थींची निवड झाली आहे. तसेच २०१८-१९ मध्ये झालेल्या पोलिस भरतीत ७२ प्रशिक्षणार्थींची महाराष्ट्र पोलिस दलात निवड झाली आहे.
निवड झालेले बहुसंख्य युवक-युवती या ग्रामीण भागातील सामान्य शेतकरी कुटुंबांतील आहेत. ग्रामस्थांनी या सर्वांना प्रोत्साहन देण्यासाठी गावाच्या वेशीवर शुभेच्छांचे फलक लावले आहेत.
.....
जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर विद्यार्थ्यांनी जिद्द, चिकाटी आणि मेहनत या त्रिसूत्रीचा अवलंब करायला हवा. यशाच्या मार्गावर मार्गक्रमण करत असताना अनेक संकटे समोर उभी ठाकतात; पण या संकटांना न डगमगता आपण पुढे मार्गक्रमण करत राहिल्यास हमखास यश प्राप्त होते.
- सुनील केदार, संचालक, संघर्ष अकादमी, किन्हवली

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs KKR Live Score: दमदार सुरुवातीनंतर कोलकाताने गमावली पहिली विकेट; नवीन-उल-हकने आक्रमक खेळणाऱ्या ओपनरला धाडलं माघारी

Lok Sabha Election 2024 : लोकसभेचा तिसऱ्या टप्प्यातील प्रचार संपला, देशभरातील 94 जागांसाठी 7 मे रोजी मतदान

Ajit Pawar : रोहित पवार झाले भावनिक, अजित पवारांनी केली नक्कल! म्हणाले, असली नौटंकी...

IPL 2024 Point Table : ऋतुराजची चेन्नई टॉप फोरमध्ये दाखल! CSK च्या विजयानं पंजाबलाच नाही तर तब्बल सहा संघांना बसला धक्का

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

SCROLL FOR NEXT