मुंबई

सर्व भाषिक पत्रकारांनी एकत्र येण्याची गरज

CD

मुंबादेवी, ता. २४ (बातमीदार) ः आजच्या ऑनलाईन आणि डिजिटल दुनियेत प्रिंट मीडिया पत्रकारितेसमोर मोठे आव्हान उभे राहिले असतानाच आजच्या घडीला इंग्रज काळापासून इग्रंजी वृत्तपत्रांना महत्त्व दिले जाते, ही बाब गंभीर आहे. भारतातील भाषिक वृत्तपत्र यांनी बंधुभाव जपून एकत्रित येऊन याविरोधात प्रखर लढा उभारला पाहिजे, तसेच भाषिक पत्रकार एकत्रित आले, तर लोकशाहीचा चौथा स्तंभ अधिक मजबूत होईल, असे प्रतिपादन माजी राज्यसभा सदस्य रवींद्र सिन्हा यांनी केले.
मुंबई मराठी पत्रकार संघाच्या वतीने ‘भारतातील भाषिक पत्रकारिता ः वर्तमान आणि भविष्य’ या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. त्या वेळी प्रमुख पाहुणे म्‍हणून रवींद्र सिन्हा उपस्थितीत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नरेंद्र वाबळे हे होते. माजी मंत्री कृपाशंकर सिंह, ज्‍येष्‍ठ पत्रकार राही भिडे, संदीप चव्हाण, राममनोहर पाठक हे मंचावर उपस्थित होते.
भारत स्वतंत्र झाल्यानंतर इंग्रजी वृत्तपत्रांची मक्तेदारी सुरू झाली. १९४८ मध्ये सुरू झालेल्या हिंदुस्थान समाचारने वृत्तपत्रात एका वर्गाची मक्तेदारी मोडीत काढली आहे. यामध्ये वल्लभाई पटेल यांची भूमिका महत्त्वपूर्ण होती, असेही सिन्हा यांनी सांगितले. वृत्तपत्र ही केवळ रोजीरोटीच नव्हे; तर निर्भीड पत्रकारिता आहे. या पत्रकारितेमुळे लोकशाहीचा चौथा खांब मजबूत आहे. इग्रंजी पत्रकारांपेक्षा हिंदी, मराठी अथवा इतर भाषिक यांची पत्रकारिता ही अधिक प्रभावी ठरली आहे, हे एका सर्वेक्षणात आढळून आले आहे. इग्रंजी वृत्तपत्राची पत तीन टक्केवर येऊन ठेपली आहे. दुसऱ्‍याच बाजूला हिंदी, मराठी इतर भाषिक पत्रकारितेची पत दुप्पटीने म्हणजे सहा टक्क्यांवर जाऊन पडली असतानाच सारा महसूल इग्रंजी वृत्तपत्रांनाच का, असा सवालही सिन्हा यांनी उपस्थित करून भाषिक पत्रकार यांनी मतभेद विसरून एकत्रित येण्याचे आवाहन केले. छापील पत्रकारिता ही समाजातील विश्वासार्हता आहे. हिंदी, संस्कृत आणि मराठी भाषेत साम्य आहे, असे माजी मंत्री कृपाशंकर सिंह यांनी सांगितले. शेवटी उपस्थितांचे आभार मानण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Google Error : गुगल डाऊन! जगभरातील युजर्स त्रस्त; अमेरिकेतून 1400 तक्रारी

Yogi Adityanath : काँग्रेस सत्तेत आल्यास हिंदूंची विभागणी होईल - योगी आदित्यनाथ

IPL 2024, CSK vs PBKS: चेन्नईला पंजाबच्या गोलंदाजांनी रोखलं अन् फलंदाजांनी ठोकलं; ऋतुराजसेनेचा बालेकिल्ल्यात दुसरा पराभव

Loksabha election 2024 : जेडीयूचे माजी प्रदेशाध्यक्ष शशांक राव यांचा भाजपात प्रवेश; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती

SCROLL FOR NEXT