मुंबई

नालेसफाई ३५ टक्क्यांच्या वर नाही

CD

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २७ ः नालेसफाईचे काम १००.५१ टक्के झाल्याचा दावा मुंबई महापालिका प्रशासनाने केला आहे, पण हा दावा विरोधी पक्षाने खोडून काढला आहे. नालेसफाईची पोलखोल पहिल्या पावसानंतर होईल. नालेसफाई ही धूळफेक असून प्रत्यक्षात केवळ ३५ टक्केच सफाई झाल्याचा आरोप महापालिकेचे विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केला आहे.

यंदा पावसाळ्यापूर्वी एकूण ९ लाख ७९ हजार ८८२ मेट्रिक टन गाळ काढण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले होते. आतापर्यंत ९ लाख ८४ हजार ९२७ मेट्रिक टन म्हणजे निर्धारित उद्दिष्टाच्या १००.५१ टक्के गाळ काढण्‍यात आल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला आहे. गाळ काढण्याची कामे योग्यरित्या होण्यासह त्यावर देखरेख करण्याच्या दृष्टीने पालिकेने कंत्राटांमध्ये यंदा अधिक सक्त अटी व शर्तींचा समावेश केला आहे. प्रत्येक कामासाठी दृकश्राव्य चित्रफीत आणि छायाचित्रे सादर करणे बंधनकारक केले आहे. काम सुरू होण्यापूर्वी, प्रत्यक्ष काम सुरू असताना आणि काम संपल्यानंतर अशा तिन्ही टप्प्यांमध्ये प्रत्यक्ष दिनांक, वेळ, अक्षांश, रेखांश यासह चित्रफीत व छायाचित्रे तयार करून ती सॉफ्टवेअरवर अपलोड करणे कंत्राटदारांना बंधनकारक केले आहे. असे छायाचित्रण व चित्रफीत तयार करताना दररोज नाल्यांमधून गाळ काढल्यानंतर तो ठेवल्याची जागा, नाल्याकाठची दैनंदिन छायाचित्रे, सदर गाळ डंपरमध्ये भरण्यापूर्वी डंपर पूर्ण रिकामा असल्याचे दर्शविणारे चित्रण, डंपरमध्ये गाळ भरताना आणि भरल्यानंतरचे चित्रण, गाळ वाहून नेल्यानंतर क्षेपणभूमीवर आलेल्या व जाणाऱ्या डंपर वाहनांच्या क्रमांकाची तसेच वेळेची नोंद करणे, क्षेपणभूमीवर येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांवर लक्ष ठेवण्यासाठी सीसी टीव्ही यंत्रणा उभारणे ही सर्व जबाबदारी कंत्राटदारांकडून घेण्यात आल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.
---
ही सर्व मुंबईकरांच्या डोळ्यात धूळफेक असून यंदा नालेसफाईची कामे योग्यरित्या झालेली नाहीत. नालेसफाई केवळ ३५ टक्केच झाली आहे. गाळ काढलेला कुणी पाहिला नाही. गाळ काढून तो उचलला गेल्याचे कुणी पाहिलेले नाही. सीसी टीव्ही यंत्रणेच्या नियंत्रणाखाली नालेसफाई झाली नाही. गाळ कुठे टाकला, कुणालाही माहिती नाही. ती जागाही कुणाला ठाऊक नाही. गाळ टाकण्याचे ठिकाण कोणते ते दाखविण्यात यावे.
- रवी राजा, विरोधी पक्षनेते

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chitra Wagh: ठाकरे गटाच्या जाहिरातीमध्ये पॉर्नस्टारचा वापर? चित्रा वाघ यांनी फोटो दाखवत केले गंभीर आरोप

Mahesh Manjrekar : स्वातंत्र्य वीर सावरकर, रणदीपचा हस्तक्षेप आणि मतभेद ; मांजरेकरांनी अखेर सोडलं मौन

Zimbabwe: झिम्बाब्वेने तयार केलं नवं चलन; पण सरकारी खात्यांमध्येच चालेनात नोटा, जनताही नाराज, काय आहे कारण?

T20 World Cup Team India : टी-20 वर्ल्ड कपचे शेर IPL मध्ये ढेर, संघात स्थान मिळताच 'हे' 6 भारतीय खेळाडू ठरलं फ्लॉप

Tech Layoffs : यंदाचं वर्ष ठरतंय 'लेऑफ'चं.. एप्रिलपर्यंत टॉप टेक कंपन्यांनी 70,000 पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना पाठवलं घरी!

SCROLL FOR NEXT