मुंबई

कळंबोलीत सिलिंडरच्या बेकायदेशीर वाहतूक

CD

नवीन पनवेल, ता. २८ (वार्ताहर)ः लोकवस्तीमध्ये रस्त्याच्या कडेला एका वाहनातून दुसऱ्या वाहनात सिलिंडरची बेकायदा अदलाबदल करणाऱ्या सहा जणांवर पनवेल तहसीलदार कार्यालयाने कारवाई केली. या सिलिंडरची ठाणे तसेच डोंबिवली परिसरात विक्री होणार होती.
कळंबोली येथील सायन पनवेल महामार्गालगत रस्त्यावरच घरगुती तसेच व्यावसायिक वापराच्या गॅस सिलिंडरची अदलाबदल सुरू असल्याची माहिती पनवेल तहसीलदार कार्यालयाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पुरवठा निरीक्षक प्रदीप कांबळे यांच्या पथकाने बुधवारी कळंबोली परिसरात पाहणी केली होती. या वेळी रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनांमधून गॅस सिलिंडर खाली उतरवून अन्य वाहनांमध्ये भरले जात असल्याचे दिसून आल्यानंतर सिलिंडर हाताळणीची आवश्यक परवानगीबाबत चौकशी करण्यात आली होती. मात्र, संबंधितांकडून समाधानकारक उत्तर मिळाले नसल्याने पनवेल पुरवठा अधिकाऱ्यांनी १५९ सिलिंडर जप्त केले असून याप्रकरणी रूपक यादव, रामचंद्र बुधावणे, विनोद साळुंखे, नबी खान, महेश कसबे तसेच दिगंबर शेळके यांच्यावर कळंबोली पोलिस ठाण्यात भादंवि कलम २८५, ३३६, ३४ सह अत्यावश्यक वस्तू अधिनियम १९५५ चे कलम ३.७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
-------------------------------
बेकायदेशीरपणे होणाऱ्या सिलिंडरच्या अदलाबदलीमुळे काळाबाजार वाढला आहे. अनेक ठिकाणी हे प्रकार उघडकीस येत असल्याने पनवेल तहसीलदार कार्यालयाकडून या प्रकारांवर नजर ठेवण्यात येत आहे.
- प्रदीप कांबळे, पुरवठा अधिकारी, पनवेल तहसील

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: फडणवीसांच्या जवळच्या व्यक्तीनं उद्धव ठाकरेंकडं भेटीसाठी मागितली वेळ?; निकालापूर्वीच मोठी घडामोड

Pune Lok Sabha Election Results : कोरेगाव पार्क परिसरात उद्या वाहतुकीत बदल; कोणते आहेत पर्यायी मार्ग, जाणून घ्या..

Hardik Pandya Natasa Stankovic : ट्रोलिंगवर सहानभुतीचा उतारा.. हार्दिकनं मुद्दाम पसरवली घटस्फोटाची अफवा?

Uddhav Thackeray: ...तर ते CCTV फुटेज बाहेर काढावे लागेल, उद्धव ठाकरेंवरील आरोपाने राजकारण ढवळून निघणार

Latest Marathi News Live Update : छत्रपती संभाजीनगरमध्ये जोरदार पाऊस; महाराष्ट्रातील अनेक भागात अवकाळीनं झोडपलं

SCROLL FOR NEXT