मुंबई

शब्बीर शेखचे मारेकरी अटकेत

CD

उल्हासनगर, ता. २८ (वार्ताहर) : शुक्रवारी (ता. २६) रात्री पावणेबारा वाजण्याच्या सुमारास शिंदे गटाचे शाखाप्रमुख शब्बीर शेख याचा खून झाला होता. याप्रकरणी अवघ्या २४ तासांत चार आरोपींना गजाआड करण्यात आले आहे. विठ्ठलवाडी ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली तिघांना पकडण्याचे योगदान देणारे उपनिरीक्षक हर्षल राजपूत यांच्या टीमचे कौतूक केले जात आहे.
शब्बीर शेख याचा जयजनता कॉलनी परिसरात मटक्याचा धंदा सुरू होता. शुक्रवारी (ता. २६) रात्री काही अज्ञात इसमांनी शब्बीर याच्या मटक्याच्या अड्ड्यात घुसून त्याच्यावर निर्घृणपणे खून केला. या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी पोलिस उपायुक्त डॉ. सुधाकर पठारे, सहायक पोलिस आयुक्त मोतीचंद राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली आठ पथके तयार करण्यात आली होती. त्यानुसार हिललाईन ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रणजीत डेरे यांच्या मार्गदर्शनाखाली क्राईम ब्रँचच्या पथकाने दिनेश कवठणकर याला उल्हासनगरातून ताब्यात घेतले. तसेच शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास विठ्ठलवाडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे उपनिरीक्षक हर्षल राजपूत, हवालदार रामदास मिसाळ, जितेंद्र चित्ते, गणेश राठोड, गणेश डमाळे, चंद्रकांत गायकवाड, विकास सोलसे यांनी कॅम्प नंबर चारमधील संभाजी चौकातून मुख्य आरोपी विक्रम कवठणकर, प्रशांत तायडे ऊर्फ सलाड, संतकबीर बोराळे या तिघांना अटक केली.

शब्बीर शेख यांच्याकडे उसने पैसे देण्याच्या वादातून पूर्वी मारामारी झाली होती. याच पूर्ववैमनस्यातून हा खून करण्यात आल्याची कबुली आरोपींनी दिली आहे. या गुन्ह्यात जयेश साळुंखे आणि विजय रूपानी हे दोन आरोपी फरारी आहेत. त्यांनाही लवकरात लवकर अटक करण्यात येईल, अशी माहिती सहायक पोलिस आयुक्त मोतीचंद राठोड यांनी पत्रकार परिषदेत दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Latest Marathi News Update : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

RTE Admission : आरटीईनुसार २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशाचे अर्ज भरण्याची प्रक्रिया तात्पुरती बंद

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

SCROLL FOR NEXT