मुंबई

टपाल विभागाला खातेदारांमुळे संजीवनी

CD

कामोठे, ता. ३० (बातमीदार) : आर्थिक गुंतवणुकीसाठी बँकापेक्षा पोस्टात गुंतवणूक करण्याकडे नागरिकांचा कल वाढत आहे. पोस्टातून जास्त व्याजदर, चांगला परतावाबरोबरच चांगली सेवा मिळत असल्याने पनवेल मुख्य पोस्ट कार्यालयाच्या खातेदारांच्या संख्येत झालेली वाढ उल्लेखनीय आहे.
सहकार क्षेत्रातील खाबुगिरीमुळे अनेक खासगी बँकांचे दिवाळे निघाले आहे. पतपेढीत गुंतवणुकीसाठी छोटे मोठे गुंतवणूकदार हात आखडता घेत असल्याची सर्वत्र परिस्थिती आहे. अशातच राष्ट्रीयीकृत बँकांकडून बचतीवर मिळणारे व्याजदर भिन्न आहे. त्यामुळे बँकेत गुंतवणूक करणारा पनवेलमधील नव गुंतवणूकदार सध्या टपाल विभागाकडे वळाला आहे. सद्यस्थितीत पनवेल मुख्य पोस्ट कार्यालयात असलेली बचत खातेदारांची संख्या हेच दर्शवत आहे. सध्या पनवेल टपाल कार्यालयाचे ७०,२२३ खातेदार आहेत. किसान विकास पत्रधारकांची संख्या ४० हजार आहे; तर चालू आर्थिक वर्षात ११ हजार नवे खातेदार जोडले गेल्याने टपाल विभागाला नवसंजीवनी मिळाली आहे.
----------------------------------------------------
विविध योजनांवरील परतावा आकर्षण
- नवीन पनवेल येथील पनवेल मुख्य पोस्ट कार्यालयांतर्गत रायगड जिल्ह्यातील पनवेल, उरण, खालापूर, खोपोली, कर्जत तालुक्यातील आणि नवी मुंबईतील कोकण भवन, वाशी, ऐरोलीमधील एकूण ३६ पोस्ट कार्यालयाचा समावेश केला जातो.
- सप्टेंबर २०१९ पासून पनवेल मुख्य पोस्ट कार्यालयात इंडिया पोस्ट पेमेंट बँक सुरू करण्यात आली आहे. तसेच बचत खात्याच्या माध्यमातून मुदत ठेवी, किसान विकास पत्र, राष्ट्रीय बचत पत्र, मासिक प्राप्ती योजना, आवर्ती ठेव, भविष्यनिर्वाह निधीत गुंतवणुकीकडे कल वाढत आहे.
----------------------------
बँकापेक्षा पोस्टात गुंतवणूक करणे फायदेशीर आहे. ठेवींवर मिळणारा व्याजदर चांगला आहे. ज्येष्ठ नागरिकांना मिळणारी सेवा उत्तम आहे.
- पुरुषोत्तम माने, ज्येष्ठ नागरिक
---------------------------------
सुरक्षित गुंतवणुकीसाठी पोस्ट सर्वोत्तम पर्याय आहे. पनवेल मुख्य पोस्ट कार्यालयातून गुंतवणुकीसाठी योग्य मार्गदर्शन केले जात आहे.
- श्रीनिवास पवार, खातेदार
-----------------------------------
पोस्टात गुंतवणूक करणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत आहे. कल्याणकारी योजना, लाभदायक परतावा, चांगली सेवा देण्यासाठी पोस्टाचे प्रयत्न आहेत.
- एच. पी. मोरे, पोस्टमास्तर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT