मुंबई

बेकायदा वाहनतळावर कारवाई

CD

लोगो वापरणे ः सकाळ इम्पॅक्ट
--------------------------------
खारघर, ता. १ (बातमीदार) : मेट्रो पुलाखालील उभ्या केल्या जाणाऱ्या वाहनांमुळे कोंडी होत होती. या वाहनांकडे वाहतूक विभागाचे दुर्लक्ष होत असल्याची बाब ‘सकाळ’ने बातमीतून मांडली होती. त्याची दखल घेत वाहतूक पोलिसांनी मेट्रो पुलाखालील बेकायदा पार्किंगवर कारवाई केली आहे.
खारघर वसाहतीमधून जाणाऱ्या नवी मुंबई मेट्रोच्या पुलाखाली सिडकोने चौपदरी रस्ता उभारला आहे. रस्त्याचा दोन्ही बाजूला दुकाने, हॉटेल, शोरूम आणि विविध बँका आहेत. विशेषतः दुकान मालक, तसेच जवळपास राहणाऱ्या इमारतीत वास्तव्यास राहणारे नागरिकांच्या गाड्या आणि अवजड वाहने मेट्रो पुलाखाली पिलरच्या लागून उभी करत होते. त्यामुळे नेहमी वाहनांची वर्दळ असलेल्या या मार्गावरील एकेरी लेनवरून वाहन चालवताना अनेकदा वाहतूक कोंडी होत होती. या प्रकाराकडे खारघर वाहतूक पोलिस बघ्याच्या भूमिकेत होते. त्यामुळे ‘मेट्रोच्या पुलाखालील बेकायदा वाहनतळ’ या वृत्तातून ‘सकाळ’ने ही बाब मांडली होती. त्यानुसार पोलिसांनी या वाहनांवर कारवाई केली आहे.
------------------------------------
रस्त्यावरच वाहन दुरुस्ती
उत्सव चौकाकडून भारती विद्यापीठकडे जाणाऱ्या मेट्रो पुलाखाली रस्त्यावर गॅरेज व्यावसायिक अनेक दिवसांपासून रस्त्यावरच वाहने उभी करून दुरुस्तीचे काम करीत असतात. रस्त्यावरच वाहने दुरुस्ती केल्यामुळे वाहनचालकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. वाहतूक पोलिसांनी या वाहनावर कारवाई करून रस्ता मोकळा करावे, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाचा Mumbai Indians ला फटका; सर्व सघांची झाली एक लढत, मोठी उलथापालथ

Supreme Court : अनावश्यक खटले टाळा! अधिकाऱ्याच्या बडतर्फीला आव्हान देणाऱ्या केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टानं फटकारलं, ठोठावला दंड

Pune BJP News: पुणे महापालिका स्वीकृत नगरसेवकांना थेट पाच वर्षांची मुदत; अडीच वर्षांच्या आशेवर पाणी, अनेक कार्यकर्त्यांचा पत्ता कट

Countries with most uranium: अणुऊर्जेसाठी लागणारं युरेनियम कोणत्या देशाकडे सर्वाधिक आहे? भारत, पाकिस्तान कितव्या क्रमांकावर?

Kidney Transplant : मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी १९७० रुग्ण प्रतीक्षेत; पुणे विभागातील १४०० पुरुषांसह ५७० महिलांचाही समावेश

SCROLL FOR NEXT