मुंबई

सुदृढ आरोग्याचा‘सायकल’मंत्र

CD

वसंत जाधव ः सकाळ वृत्तसेवा
एक काळ असा होता जेव्हा आपल्याकडे वाहतुकीचे उत्तम साधन सायकल होते. घरी, ऑफिस, मार्केट, शैक्षणिक संस्था किंवा इतर ठिकाणी जाण्यासाठी सायकलचाच वापर केला जात असे. मात्र, मधल्या काळात डिझेल-पेट्रोलवर चालणाऱ्या वाहनांचा वापर वाढल्याने सायकलच्या वापराकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे प्रदूषणाचे प्रमाण वाढल्याने आरोग्याचे प्रश्न निर्माण झाले आहेत, पण काळाची चाके पुन्हा फिरली असून आरोग्य सुदृढ रहावे म्हणून सायकलचा वापर करणाऱ्यांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे.
---------------------------------------------------
अनेक वर्षे सायकल हेच वाहन प्रचलित होते. जगभरात सायकलचा वापर केला जात होता. त्याकाळी ज्यांच्याकडे सायकल असेल ती व्यक्ती श्रीमंत मानली जात होती. समाजात त्याला मोठी प्रतिष्ठा मिळत होती; परंतु मध्यंतरीच्या काळामध्ये सायकलचा वापर कमी झाला होता. वाहतुकीचे किफायतशीर साधन इतिहासजमा होईल की काय, अशा प्रकारची स्थिती होती. कारण दुचाकी आणि चारचाकी वाहनांचा वापर वाढल्याने अनेकांनी सायकलकडे पाठ फिरवली होती; पण दुचाकी किंवा चारचाकीमुळे सुखावह शारीरिक हालचाल कमी झाल्याने त्याचे दुष्परिणामही होऊ लागले होते. अनेकांना स्थूलपणा, तसेच वेगळ्या प्रकारच्या व्याधी जडू लागल्याने व्यायामाचा उत्तम पर्याय म्हणून सायकल चालवण्याकडे पुन्हा कल वाढला आहे. त्यामुळे सायकलिंगचा सल्ला आरोग्य तज्ज्ञांकडून दिला जात आहे. याचा सकारात्मक परिणाम दिसू लागला असून सायकल खरेदी करणाऱ्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे.
-----------------------------
स्वच्छतेसाठी सायकलचा वापर
स्वच्छ भारत अभियान देशात प्रभावीपणे राबवले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणेतून अनेक सामाजिक संस्था यासाठी काम करीत आहेत. त्यामध्ये उरणमधील प्रकाश केणी आणि कळंबोली येथील सामाजिक कार्यकर्ते तानाजी बामणे मागे राहिलेले नाहीत. या दोघांनी स्वच्छतेचा संदेश देण्यासाठी नवी मुंबई ते उत्तराखंड असा अडीच हजार किलोमीटरचा प्रवास सायकलवर केला आहे.
---------------------------------------
भाडेतत्त्वावर सायकलचा प्रयोग!
खारघरमध्ये सिडकोने भाडेतत्त्वावर सायकलचा प्रयोग सुरू केला होता. महत्त्वाच्या ठिकाणी सायकल स्टॅण्ड करून तासिकेवर भाडेतत्त्वाने सायकल नागरिकांना उपलब्ध करून देण्याचा एक स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला होता. त्याला रहिवाशांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला; परंतु कालांतराने अशा प्रकारच्या सायकलकडे खारघरकरांनी पाठ फिरवली.
---------------------------------------
सायकलवर पालिकेत येणारे भगवान पाटील!
पनवेल महापालिकेत अधीक्षक पदावर कार्यरत असणारे भगवान पाटील आणि त्यांची सायकल पनवेलकरांना परिचित होती. नगर परिषदेमध्ये रोज कामाला येताना त्यांनी अनेक वर्षे सायकलचा वापर केला. आजही सार्वजनिक ठिकाणी कित्येकदा भगवान पाटील सायकलवर रपेट मारताना दिसतात. इतरांसमोर त्यांनी एक वेगळा आदर्श घालून दिला आहे.
-------------------------------------------
व्यायामाबरोबरच स्नायूच्या बळकटीसाठी सायकल चालवणे हा एक उत्तम व्यायाम आहे. सायकल क्लबच्या माध्यमातून मित्र मंडळी जमवून पनवेल परिसरातील सर्व प्रेक्षणीय स्थळे सायकलने जाऊन पाहिली आहेत. यामुळे सर्व मित्र मंडळींनी सायकली घेतल्या आहेत.
- मनेश बच्छाव, पोलिस उपनिरीक्षक, नवी मुंबई सायकल क्लब, पनवेल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT