मुंबई

अमर कोर विद्यालयाचा शंभर टक्‍के निकाल

CD

अमर कोर विद्यालयाचा शंभर टक्‍के निकाल
मुलुंड, ता. ५ (बातमीदार) ः अमर कोर विद्यालय भांडुप यांचा शालांत परीक्षेत सालाबादप्रमाणे यंदाही शंभर टक्के निकाल लागला आहे. शाळेचे संचालक मारुती म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने शंभर टक्‍के निकालाची १२ वर्षे म्हणजेच एक तप पूर्ण केले आहे. यंदा सुमित माधव होनसांगेड या विद्यार्थ्याने ९८ टक्‍के गुण प्राप्त करून शाळेतून प्रथम येण्याचा मान मिळवला आहे; तर श्रद्धा बोराटे हिने ९४.६० टक्‍के गुण प्राप्त करून द्वितीय व प्राची सुर्वे हिने ९२.४० टक्‍के गुण प्राप्त करून तृतीय क्रमांक पटकावला आहे. शाळेचे संचालक मारुती म्हात्रे, शाळेचे सचिव जीवन म्हात्रे, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक साईनाथ हांडे, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक अजय पवार, पर्यवेक्षिका संगीता मोरे व सर्व शिक्षक यांच्या प्रयत्नांनी व मार्गदशनामुळे शाळेचा या वर्षी शंभर टक्‍के निकाल लागला आहे. परिणामी शाळेचे आणि सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे समाजातील सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ब्रिटिश साम्राज्याच्या लोकशाहीतील पाऊलखुणा

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 04 मे 2024

राजकीय पक्षांच्या नजरेतून स्त्रियांचे प्रश्‍न

आयुर्वेदिक पंचकर्म

रक्तातील साखरेचे ‘हिस्टरी बुक’

SCROLL FOR NEXT