मुंबई

कोपरखैरणेतील ट्री बेल्टमध्ये नासधूस

CD

घणसोली, ता. ६ (बातमीदार)ः नवी मुंबई महापालिकेच्या वतीने शहरात प्रत्येक नोडमध्ये उद्याने, मैदाने, ट्री बेल्ट उभारले गेले आहेत. या माध्यमातून शहराविषयाची माहिती नागरिकांना मिळावी, असा प्रयत्न आहे; पण काही जणांकडून त्यांची नासधूस केली जात असून कोपरखैरणेतील नागरिकांच्या ट्री बेल्टमध्ये नवी मुंबईतील विविध पक्षांची माहिती असणारे फलक तोडण्यात आल्याने नाराजी व्यक्त होत आहे.
कोपरखैरणे विभागातील बोनकोडे येथे रस्त्याच्या कडेलाच महापालिकेच्या वतीने शोभेसाठी ट्री बेल्ट उभारले आहे. या ट्री बेल्टमध्ये विविध प्रकारची झाडे आहेत तसेच या ठिकाणी नागरिकांना बसण्याची सुविधा आहे. त्यामुळे नेहमीच मोठ्या प्रमाणात वर्दळ असलेल्या या परिसरात महापालिकेने नवी मुंबईतील शहरातील विविध पक्षांची माहिती देणारे काही फलक उभारले आहेत. या फलकाच्या माध्यमातून पालिकेने विविध पक्षांची माहिती दिली आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून हे फलक फाडण्यात येत असल्याने अर्धवट माहिती दिसत असल्याने नागरिकांमधून या प्रकाराबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे.
-------------------------------------------
फेरीवाले, बेघरांचा वावर
सुनियोजित असलेले नवी मुंबई शहर पाहण्यासाठी अनेक नागरिक शहराच्या बाहेरून येत असतात. त्यामुळे शहराचे वेगळेपण समजावे, म्हणून पालिकेने ट्री बेल्ट ही संकल्पना राबवली आहे; पण या ट्री बेल्टमध्ये अनधिकृत फेरीवाले, बेघरांचा वावर असून त्यांच्याकडून या फलकांची दुरवस्था होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे महापालिकेने याबाबत उपाययोजना कराव्यात, मागणी नागरिक करत आहेत.
ः----------------------------------
बोनकोडे येथे रस्त्याच्या कडेलाच महापालिकेने उभारलेल्या ट्री बेल्टमधील शहरात आढळणाऱ्या पक्षांची माहिती नागरिकांना मिळावी, यासाठी फलक लावण्यात आले आहे. मात्र, कोणीतरी हे फलक फाडले असल्याने अर्धवट माहिती मिळत आहे.
- नीशा सोनटक्के, नागरिक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Cylinder 5 KG पाच किलो एलपीजी सिलिंडरबाबत नवा नियम, खरेदीसाठी ओळखपत्र बंधनकारक

बारामतीत काँग्रेसनं उमेदवारी दिलेले आकाश मोरे कोण? अजित पवारांच्या विरोधात डिपॉझिट झालेलं जप्त

RCB vs CSK: अरे काय केलं... विराट कोहलीचा शिवम दुबेने एकदम सोपा कॅच सोडला; अनुष्का शर्माही शॉक; Video Viral

अल्पवयीन बहिणींच्या लग्नाचा घाट, पोलिसांसह अधिकाऱ्यांनी रोखला बालविवाह

IPL 2026: १९ षटकार... टीम डेव्हिडची वादळी फटकेबाजी, पडिक्कलचीही फिफ्टीच; CSK विरुद्ध RCB च्या अडीचशे धावा पार

SCROLL FOR NEXT