मुंबई

चर्चगेट भागात मुलीची हत्या

CD

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ६ : मुंबईतील चर्चगेट भागातील सावित्रीबाई फुले वसतिगृहामध्ये २१ वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. या तरुणीवर बलात्कार करून तिची हत्या केल्याचे सांगितले जात आहे. मरीन ड्राईव्ह पोलिसांनी याप्रकरणी गुन्ह्याची नोंद केली आहे.

वसतिगृहातील राहत्या खोलीत मुलीचा मृतदेह मंगळवारी (ता. ६) नग्नावस्थेत सापडला. पीडित मुलगी मूळची अकोल्याची असून वांद्र्यातल्या एका प्रसिद्ध कॉलेजमध्ये शिकण्यासाठी मुंबईत आली होती. मंगळवारी संध्याकाळी चार वाजताच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. माहिती समजताच पोलिसांचे एक पथक घटनास्थळी पोहोचले. दोन दिवसांनी आपल्या घरी जाण्यासाठी पीडित मुलगी तयारीत होती, अशी माहिती पोलिसांनी दिली. या वसतिगृहाचा वॉचमन प्रकाश कनोजिया घटनेनंतर फरार असून त्याचा मोबाईल इमारतीत सोडून गेल्याचे सांगितले जात आहे. मरीन ड्राईव्ह पोलिसांचे एक पथक वॉचमनच्या मागावर आहे. प्राथमिक अंदाजानुसार या घटनेमध्ये बलात्काराची शक्यता वर्तवली जात आहे. मरीन ड्राईव्ह पोलिस वैद्यकीय अहवालाच्या प्रतीक्षेत असून प्रकरणाचा अधिक तपास करत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pusad Gun Firing : पुसद मध्ये गोळीबार, चाकूहल्ल्यात दोघे जखमी; घटनेने खळबळ

FIFA सामन्यात दिसलेलं 'ग्रीन व्हिसल' नेमकं आहे तरी काय? Pain कमी करणाऱ्या या उपकरणाची जगभर होतेय चर्चा!

Latest Marathi News Update : राज्यासह देशभरात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Khadakwasala Dam : धरण क्षेत्रात यंदा पावसाची मोठी तफावत; सरासरी ९५.८४ टक्के घट, पाणीसाठ्याबाबत चिंता

Land Acquisition : माऊलींच्या पालखीसाठी अवघ्या तीन महिन्यात भूसंपादन; इमारत पाडण्याचे काम सुरू

SCROLL FOR NEXT