Bogus Cosmetics sakal
मुंबई

Bogus Cosmetics : बनावट सौंदर्य प्रसाधनांचा कोट्यावधींचा साठा जप्त

बनावट सौंदर्य प्रसाधनांची विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यासह कारखानदाराला मुंबई पोलिसांनी शुक्रवारी अटक केली.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - बनावट सौंदर्य प्रसाधनांची विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यासह कारखानदाराला मुंबई पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. आरोपींकडून १ कोटी ४० लाख रुपये किंमतीची बनावट सौंदर्य प्रसाधने जप्त करण्यात आली.

पालघर आणि वसई परिसरातील कारखान्यांत बनावट सौंदर्य प्रसाधने बनवून त्यांची मुंबई, नवी मुंबई, ठाणे परिसरासह गुजरात, दिल्ली राज्यांमध्ये विक्री करण्यात येत असल्याची पोलिसांनी माहिती दिली आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा नियंत्रण कक्षाने ही कारवाई केली.

नामांकीत कंपनीच्या बनावट सौंदर्य प्रसाधने विक्री करण्यासाठी रेतीबंदर परिसरात एक जण येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. माहितानुसार, पथकाने सापळा रचत संशयित टेम्पोमधून १८ लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.

याप्रकरणी माहिम पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करत पोलिसांनी पुढील तपास सुरू केला. दरम्यान अटक करण्यात आलेल्या व्यापाऱ्याने बनावट सौंदर्य प्रसाधने पालघर येथील त्याच्या गोदामवजा कारखान्यात आणि वसई येथील कारखान्यात तयार केल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

आरोपींने या मालाची मुंबई, नवी मुंबई, ठाणे परिसरासह गुजरात, दिल्ली राज्यांमध्ये विक्री करत असल्याचे कबुली दिली. त्यानुसार, तीन वेगवेगळी पथके तयार करून नालासोपारा येथील गोदाम व दोन कारखान्यांवर छापा टाकत विविध नामवंत कंपन्यांची बनावट उत्पादने तसेच ती बनवण्यासाठी वापरण्यात येणारे यंत्र व कच्चा माल पोलिसांकडून जप्त करण्यात आला. गुन्हे शाखेने कारखान्याच्या मालकालाही अटक केली. या दोघांना १२ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

मुद्देमाल पोलिसांकडून जप्त

सौंदर्य प्रसाधनांसाठी वापरण्यात येणाऱ्या नामांकित कंपनीच्या नावाची रिकामी बनावट वेष्टने, स्टिकर्स, पॅकींगचे साहित्य, सुटी कॉसमॅटीक पावडर, यंत्र असा एकूण १ कोटी ४१ लाख ७४ हजार ८१५ किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tata Chairman Salary: Tata Sons च्या चेअरमनला किती पगार मिळतो? नोएल टाटांच्या विरोधानंतर पद पुन्हा चर्चेत; आकडा पाहून धक्का बसेल!

Akola News : जिल्हाधिकाऱ्यांनी सोडले शेतकऱ्यांना वाऱ्यावर; महाबीज प्रशासनाकडून माहिती देण्यास नकार, एमडींनीही केले हात वर

Ai+ Nova 2 Power 5G भारतात लाँच! 16,999 रुपयांत खरेदीची संधी...पाहा फीचर्स अन् ऑफर्स!

Katraj Kondhwa Road Issue : आयुक्तांचे आश्वासन विरणार हवेत! कात्रज कोंढवा रस्ता; उर्वरित १० मिळकतींमुळे रस्ता रुंदीकरण रखडणार

Farmer Agitation : शेतकरी संकटात, सरकार कुठंय? लोहाऱ्यात हजारो शेतकऱ्यांचा आक्रोश; आमदारांना बोलण्यास मनाई करत शेतकऱ्यांनी सोयाबीन उधळले

SCROLL FOR NEXT