मुंबई

आता ५७ मेल-एक्स्प्रेस गाड्यांना ''एचओजी''

CD

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १४ : मध्य रेल्वेने ऑपरेशनचा खर्च कमी करण्यासाठी आणि प्रदूषणाला आळा घालण्यासाठी ५७ मेल-एक्स्प्रेस गाड्यांमध्ये ‘हेड ऑन जनरेशन’ (एचओजी) तंत्रज्ञानाचा वापर सुरू केला आहे. त्यामुळे डिझेल जनरेटरला विजेला पर्याय उपलब्ध झाल्याने मध्य रेल्वेची दरमहा अंदाजे १५ कोटी रुपयांची बचत होणार आहे.
भारतीय रेल्वे प्रदूषणाला आळा घालण्यासाठी विद्युतीकरणावर जास्त भर देत आहे. आता तर रेल्वेच्या खर्चात बचत करण्यासाठी हे तंत्रज्ञान वापरण्यावर भर देत आहे. या तंत्रज्ञानामुळे जनरेटरपेक्षा रेल्वेच्या वर असणाऱ्या तारांनी रेल्वेला वीज पुरवली जात आहे. त्यामुळे रेल्वे गाड्यांच्या डब्यातील वातानुकूलन यंत्र, दिवे, पंखे आणि पॅण्ट्री या प्रवासी सुविधा कार्यान्वित केल्या जातात. मध्य रेल्वेने आपल्या ऑपरेशनचा खर्च कमी करण्यासाठी आणि प्रदूषणाला आळा घालण्यासाठी ५७ मेल-एक्स्प्रेस गाड्यांमध्ये या तंत्रज्ञानाचा वापर सुरू केला आहे. त्यामुळे १५ कोटी रुपयांची बचत होतानाच कार्बन उत्सर्जनावर अंदाजे ५ हजार ५०० टनांनी अंकुश ठेवला जातो. १७० पैकी ९५ रेकमध्ये आधीच हे तंत्रज्ञान आहे.
...
पश्चिम रेल्वेवर आधीच सुविधा
पश्चिम रेल्वेने २०२२-२३ मध्ये ३० हजार ११० ट्रेनमधून जनरेटर कार (पॉवर कार) काढून टाकून त्या एचओजी तंत्रज्ञानावर चालवण्यास सुरुवात केली आहे. २०२१-२२ मध्ये २२ हजार ९१४ ट्रेनमध्ये ही यंत्रणा सुरू करण्यात आली होती. त्याद्वारे १३६ कोटी रुपयांची बचत झाली होती. २०२२-२३ मध्ये एचओजी ऑपरेशन्समुळे आतापर्यंतची सर्वाधिक आर्थिक बचत करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dr. Jaysingrao Pawar Passes Away: छत्रपतींचा इतिहास उजळवणारा संशोधक हरपला; डॉ. जयसिंगराव पवार यांचे निधन

Satara ZP Controversy: सातारा झेडपीतील गोंधळाचे मंत्री गोरेच सूत्रधार: देसाई, मांडवे; आमचा एन्काउंटर करण्याचा पोलिसांचा होता डाव!

US Iran Conflict : मोठा दिलासा ! गॅस तुटवड्याचं संकट टळणार, इराणने भारतासाठी खुली केली होर्मुझची सामुद्रधुनी

लाडक्या बहिणींना मिळणार ४५०० रुपये! एप्रिलमध्ये ज्यांना मिळेल लाभ, त्यांचाच सुरु राहणार लाभ; ‘ई-केवायसी’तील दुरुस्तीसाठी ३१ मार्च मुदत, वाचा...

Panchang 26 March 2026 : दत्त कवच स्तोत्राचे पठण आणि ‘बृं बृहस्पतये नमः’ या मंत्राचा जप करावा

SCROLL FOR NEXT