मुंबई

आठ कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित

CD

मनोर, ता. १० (बातमीदार) : बोगस बियाणे आणि खतांची विक्रीतील गैरप्रकार रोखण्यासाठी कृषी विभागाकडून भरारी पथक नेमण्यात आले आहे. या पथकाने केलेल्या कारवाईत दोन दुकानांचा खत विक्रीचा परवाना निलंबित करण्यात आला. खत विक्री होत नसलेल्या अन्य सहा कृषी सेवा केंद्रांवर खत विक्रीच्या परवान्यांच्या निलंबनाची कारवाई करण्यात आली.

खरीप हंगामात शेतकऱ्यांना उत्कृष्ट दर्जाचे बियाणे आणि खतांचा पुरवठा सुरळीतपणे सुरू राहण्यासाठी कृषी विकास अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली भरारी पथकाची नेमणूक करण्यात आली आहे. वाडा तालुक्यातील कृषी सेवा केंद्राची तपासणी केली असता नियमांचा भंग केल्याचे भरारी पथकाला आढळून आले होते. कृषी विकास अधिकाऱ्यांच्या अहवालानुसार, जिल्हा कृषी अधिकारी नीलेश भागेश्वर यांनी वाडा तालुक्यातील एका कृषी केंद्राचा किरकोळ खत विक्री परवाना सहा महिन्यांसाठी निलंबित केला. परवाना निलंबन कालावधीत खतांची खरेदी साठवणूक, तसेच विक्रीस मनाई करण्यात आली. तसेच कृषी विभागाकडून परवाना मिळाल्यानंतरही प्रत्यक्ष खताची विक्री केली जात नसल्याने जिल्ह्यातील सहा कृषी सेवा केंद्रांचे खत विक्री परवाने निलंबित करण्यात आले.

जादा दरात विक्री, युरियाचा काळा बाजार आणि शेतकऱ्यांना तासनतास रांगेत उभे राहण्याची वेळ येऊ नये, यासाठी दक्षता घेण्यात आली आहे. खरीप हंगामातील युरियाचा मुबलक साठा उपलब्ध आहे.
- प्रकाश राठोड, कृषी विकास अधिकारी, पालघर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Railway: प्रवाशांनो लक्ष द्या! रेल्वे गाड्यांची वेळ बदलणार, मध्य रेल्वेची घोषणा; कधीपासून होणार नवे वेळापत्रक लागू?

Alphonso Mango Price : हापूस आंबा अडीच हजार रुपये डझन; वाशी मार्केटला रत्नागिरी, देवगडमधून सर्वाधिक पेट्या रवाना

PAK vs NAM सामन्यावर पावसाचे ढग; ऑस्ट्रेलियासारखीच पाकिस्तानची अवस्था होणार? नेमकं कसं आहे समीकरण

पैशांचा पाऊस! 8.5 कोटींच्या नोटांनी झाकला डान्स फ्लोअर; शाही लग्नाचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल, एवढी मोठी कॅश पाहून वऱ्हाडी मंडळीही अवाक्

Latest Marathi News Live Update : पंढरपुरात टेम्पो दुचाकीमध्ये भीषण अपघात, तीन जण जखमी

SCROLL FOR NEXT