मुंबई

क्रेनच्या धडकेत सायकलवरील सुरक्षारक्षकाचा मृत्यू

CD

पनवेल, ता. ९ (वार्ताहर) : सायकलवरून कंपनीत कामावर जात असलेल्या सुरक्षारक्षकाला भरधाव हायड्रा क्रेनने धडक दिल्याची घटना घडली आहे. या अपघातात सुरक्षारक्षक हायड्रा वाहनाच्या चाकाखाली येऊन जागीच ठार झाला. तळोजा एमआयडीसीमध्ये रविवारी (ता. ९) दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. तळोजा पोलिसांनी या अपघाताला जबाबदार असलेल्या हायड्रा चालकाविरोधात गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे. अमन जितेंद्र तिवारी (वय ३०) असे अपघातात मरण पावलेल्या सुरक्षारक्षकाचे नाव असून तो मूळचा बिहार राज्यातील आहे. मागील सहा महिन्यांपासून तो तळोजा एमआयडीसीतील हायकल कंपनीत सुरक्षारक्षक म्हणून काम करत होता. रविवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास तो नावडा फाटा येथून सायकलवरून कंपनीत कामावर जात होता. या वेळी तो अल्पेश काटा येथे आला असताना हायड्रा वाहनाने त्याला धडक दिली. या अपघातात तो हायड्राच्या चाकाखाली आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर हायड्रा वाहन चालकाने त्या ठिकाणावरून पलायन केले असून तळोजा एमआयडीसी पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs SRH Live : सनरायझर्स हैदराबादचा इडन गार्डनवर दरारा! कोलकाता नाइट रायडर्सचा सलग दुसरा पराभव; गुणतालिकेत फेरबदल

Bharat Solanke : ‘स्टेअरिंग’ सोडलं अन् हातात घेतली लेखणी; ट्रकचालक भारत सोळंके यांचा ‘पीएचडी’पर्यंतचा थक्क प्रवास

IAS transfer: राज्यातील २५ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; रात्री उशिरा काढले आदेश

हनुमान जन्मोत्सवानिमित्त वानरांची शिस्तीत पंगत; वानरांना एका रांगेत बसवून केले अन्नदान

Pune CNG Price Hike: मोठी बातमी! पुण्यात 'सीएनजी'चे दर वाढले; मध्यरात्रीपासून नवा भाव लागू होणार

SCROLL FOR NEXT