मुंबई

तलासरीत काळजातल्या कविता सादर

CD

कासा, ता. २६ (बातमीदार) : तलासरी येथे परुळेकर महाविद्यालयात मोहनभाई पटेल सभागृहात मराठी वाङ्मय मंडळाचे उद्‍घाटन करण्यात आले. यावेळी कला अकादमी व मराठी वाङ्मय मंडळाच्या वतीने ''काळजातल्या कविता'' या विषयावर कार्यक्रम आयोजित केला होता. प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. डॉ. बाळासाहेब लबडे व शाहीर शाहिद खेरटकर उपस्थित होते. महाविद्यालचे प्राचार्य डॉ. बी. ए. राजपूत यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना मराठी वाङ्मय मंडळाची आवश्यकता का आहे? तसेच मराठी वाङ्मय मंडळामार्फत वर्षभरात महाविद्यालयात आयोजित करण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती सांगितली.

‘काळजातल्या कविता’ या कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रा. बाळासाहेब लबडे यांनी मराठी भाषेची महती सांगितली. शाहीर शाहिद खेरटकर यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ''उन्हाचा कहर, पडे पावसाचे पाणी गाई बळीराजा गाणी, मी कर्म शोधतो आहे, बाबासाहेब तुमची आणखी एक कविता, तळे साचले प्रेम सांडून गेले उभ्या संसारी दिस भांडूनी गेले, हृदयातल्या घरांची उघडा दारे समाज सुधारा रे आदर्श उभारा रे'' या कविता सादर केल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कला अकादमी प्रमुख प्रा. दीपक वाकडे यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंची मोठी कारवाई! पुणे विद्यापीठाच्या मेसचा परवाना रद्द, गंभीर त्रुटी निदर्शनास आल्याची माहिती

Latest Marathi News Update: राज्यासह देशात आज कुठे काय घडलं? जाणून घ्या...

IND vs AFG: अफगाणिस्तानला गिल-ईशानने चोपलं, गोलंदाजांनी रोखलं; भारताचा दुसऱ्या वनडेत दणदणीत विजय, मालिकाही खिशात

Pune Crime : 'त्या' जीम व्यावसायिकाला मारण्यासाठी २० लाख रुपयांची दिली होती सुपारी; आरोपींच्या पोलिस कोठडीत वाढ

Pune Crime : अमानुष छळ करत मूत्र पाजले, मारहाण करत विजेचे शॉकही दिले; भोंदुबाबाकडून महिलेचा छळ

SCROLL FOR NEXT