मुंबई

दरोड्याचा तपास ठाणे क्राईम ब्रॅंचकडे

CD

उल्हासनगर, ता. २६ (बातमीदार) : नेपाळी वॉचमनने त्याची पत्नी आणि साथीदारांच्या मदतीने उल्हासनगरातील विजयालक्ष्मी ज्वेलर्स या दुकानात दरोडा टाकून ३ कोटी २० लाखांचे सोने लंपास केले होते. या घटनेला एक महिना झाला तरी अद्यापही आरोपीचा ठावठिकाणा सापडत नसल्याने हे प्रकरण अधिवेशनात गेले आहे. या प्रकरणाचा तपास ठाणे क्राईम ब्रॅंचकडे सोपवण्याची मागणी आमदार कुमार आयलानी यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

शिरू चौक परिसरात असलेले विजयालक्ष्मी ज्वेलर्सचे दुकान मंगळवारी बंद असते. याचाच फायदा घेत २६ जून रोजी रात्री नेपाळी वॉचमन महेश व त्याच्या पत्नीसह चार ते पाच जणांनी दरोडा टाकला. चार गॅस कटरच्या मदतीने तिजोऱ्या फोडून त्यातील तब्बल ३ कोटी २० लाख रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केले होते. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली होती. पोलिस उपायुक्त डॉ. सुधाकर पाठारे, सहायक पोलिस आयुक्त अमोल कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली उल्हासनगर ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिलीप फुलपगारे हे या घटनेचा तपास करीत आहेत; मात्र आरोपींचा ठावठिकाणा सापडत नसल्याने या प्रकरणाचा तपास ठाणे क्राईम ब्रॅंचकडे सोपवण्यात यावा, अशी मागणी आमदार कुमार आयलानी यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain Update: पुण्यात रात्रभर पावसाची जोरदार बॅटिंग; जंगली महाराज रोडवर जुने वृक्ष कोसळले, वाहतूक कोंडीची शक्यता

IMD Rain Forecast : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचा पट्टा ओसरला; पाऊस थांबणार, मुंबईसह घाटमाथ्यांवर इशारा

Latest Marathi News Live Update : खडकवासला धरणातून २७,२०३ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू

Pune Flood Alert: पुण्यात पूरस्थितीची चाहूल! खडकवासलातून मोठा विसर्ग, एकतानगरातील दोन सोसायट्यांत पाणी शिरले, महापौर नागुपरेंची पाहणी

Ashadhi Wari: ४३ वर्षांची अखंड परंपरा कायम! गंगापूरहून १२०० वारकऱ्यांची पायी दिंडी पंढरपूरकडे मार्गस्थ; भक्ती, शिस्त आणि परंपरेचा अनोखा संगम

SCROLL FOR NEXT