मुंबई

चौकशी समितीची दुसऱ्या दिवशीही हजेरी

CD

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १८ : ठाणे पालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात घडलेल्या मृत्यूप्रकरणी चौकशी समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीने गुरुवारी दुपारपासून ठाणे मुख्यालयात धडक दिली. या वेळी रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांसह डॉक्टरांची चौकशी करण्यात आली. काही महत्त्वाची कागदपत्रे ताब्यात घेतली आहेत. रात्री ११ वाजेपर्यंत रुग्णालयाची झाडाझडती घेतल्यानंतर शुक्रवारी (ता. १८) पुन्हा तपासणी केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
मागील आठवड्यात ठाणे पालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात एकाच दिवशी १८ रुग्णांच्या मृत्यूचे तांडव घडले. या प्रकरणाची गांभीर्याने दाखल घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चौकशी समिती नेमली. या समितीच्या माध्यमातून रुग्णालयातील मृत्यूच्या घटनांची चौकशी करून २५ ऑगस्टपर्यंत अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार गुरुवारी चौकशी समितीने ठाणे पालिका मुख्यालयावर धडक दिली. या वेळी रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांसह डॉक्टरांची सखोल चौकशी करण्यात आली. त्यानंतर समितीतील सदस्यांनी कळवा रुग्णालयाकडे धाव घेत रुग्णालयाची रात्री ११ वाजेपर्यंत पाहणी केली.

------------------
महत्त्वाची कागदपत्रे ताब्यात
प्रत्येक वॉर्डात जाऊन रुग्णांना वेळेत उपचार मिळतात की नाही, याचीही चौकशी समितीने खातरजमा केली आहे. तसेच रोज उपचारासाठी किती रुग्ण येतात, किती शस्त्रक्रिया होतात, शिवाय ज्या रुग्णांचा मृत्यू झाला त्यांचीदेखील माहिती घेण्यात आली. त्यातही त्यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, याची माहितीही त्यांनी घेतली आहे. तसेच काही महत्त्वाची कागदपत्रे हाती घेण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर शुक्रवारीही दुपारी दोन वाजता या समितीमधील सदस्यांनी कळवा रुग्णालयात हजेरी लावली होती. त्यावेळी काही शिल्लक कागदपत्रेदेखील त्यांनी आपल्या ताब्यात घेतली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Goregaon Drugs Party: ''मला एक पिवळी गोळी खायला दिली...'' शुद्धीवर आलेल्या तरुणीचा जबाब; पार्टीतली 'नो कॅमेरा पॉलिसी' काय होती?

'होय मी जयभीमवाली' चिन्मयी सुमीतनं मांडलं स्पष्ट मत, म्हणाल्या... 'मी आंबेडकरांची फॅन आहे आणि जय भीम म्हणण्यामागे...'

Latest Marathi News Live Update: नीरव मोदीला भारतात आणलं जाणार, CBIचे अधिकारी लंडनमध्ये

भाविकांच्या बसचा भीषण अपघात, ६ जणांचा जागीच मृत्यू, २५ जखमी

Pune Yerwada News: पुण्यातील येरवडा प्रादेशिक मनोरुग्णांची हेळसांड थांबवा; सहसंचालक डॉ. गोल्‍हाइत यांच्या अधिकाऱ्यांना सूचना..

SCROLL FOR NEXT