मुंबई

जागरूक मतदार हाच लोकशाहीचा आधारस्तंभ

CD

बोईसर, ता. ३१ (बातमीदार) : लोकशाही यशस्वी करायची असेल तर मतदार हा जागरूक हवा. जागरूक मतदार हाच लोकशाहीचा आधारस्तंभ आहे, असे मत उपजिल्हाधिकारी अपर्णा सोमाणी-आरोलकर यांनी व्यक्त केले. जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालय, पालघर, आम्ही शिक्षक सामाजिक संस्था, मतदार नोंदणी अधिकारी कार्यालय, पालघर आणि श्री पी. एल. श्रॉफ महाविद्यालय संयुक्त विद्यमाने निवडणूक साक्षरता मंडळाचा उद्‍घाटन समारंभ आयोजित केला होता. यावेळी त्या बोलत होत्या.

निवडणूक साक्षरता मंडळाच्या पालघर जिल्ह्याचे प्रकल्प समन्वयक सुशील शेजुळे यांनी निवडणूक साक्षरता मंडळाच्या स्थापनेमागील भूमिका, त्याची कार्ये आणि उद्देश यांच्यावर प्रकाश टाकला. तसेच पुढील काही दिवसांत जिल्ह्यातील महाविद्यालयात निवडणूक साक्षरता मंडळे स्थापन करण्यात येणार आहेत. महाविद्यालयात नवीन मतदार नोंदणी शिबिराचे आयोजन कारण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रा. जनार्दन शिंदे यांनी लोकशाहीचे स्वरूप सांगून ती यशस्वीपणे राबविण्यासाठी मतदारांची भूमिका अतिशय महत्त्वाची असल्याचे मत मांडले. लोकशाही ही एक आदर्श प्रणाली असून तिचा भाग होण्याचे सौभाग्य भारतीयांना लाभले, याबद्दल त्यांनी समाधानही व्यक्त केले. १८ वर्षे पूर्ण झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्याने मतदार नावनोंदणी करून निवडणूक प्रक्रियेत अवश्य सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चिंचणी-तारापूर शिक्षण संस्थेच्या सदस्या डॉ. रमिलाबेन श्रॉफ उपस्थित होत्या. तहसीलदार रमेश शेंडगे व संस्थेचे चेअरमन रजनीकांतभाई श्रॉफ यांचे कार्यक्रमासाठी मार्गदर्शन लाभले. उद्यापासून विद्यार्थ्यांच्या मतदार नावनोंदणी शिबिराला सुरुवात करण्यात येईल, अशी घोषणाही यावेळी करण्यात आली.

यावेळी नायब तहसीलदार संभाजी पावरा, उपप्राचार्या डॉ. सुचिता करवीर, प्रा. चित्रा अष्टेकर, प्रा. रंजिता कपूर, परवीन सोलंकी, प्रा. अमिता पाटील, प्रा. जयकांत ठाकूर, प्रा. निष्ठा केळकर, तसेच शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Explainer: फडणवीस आणि शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका; पण राज ठाकरेंसाठी 'मवाळ भूमिका', नेमकं समीकरण काय? वाचा सोप्या शब्दात

IND vs ENG 2nd Test: २६९, १००* ! शुभमन गिलचे शतक अन् ५४ वर्षांपूर्वीचा विक्रम उद्ध्वस्त; एकाही भारतीयाला नव्हता जमला हा पराक्रम

SBI Bank Manager Viral Video : ''तुला iPhone देईन, शारीरिक संबंध ठेव..’’ म्हणत, महिला कर्मचारीशी घृणास्पद कृत्य करणाऱ्या SBI व्यवस्थापकाचा भांडोफोड!

Yavatmal News: लाखो विद्यार्थ्यांचा खडतर प्रवास! शिक्षणासाठी खेड्यातून ‘अप-डाऊन’, सवलतीच्या पासचा दिलासा पण...

Pune Crime : ४० दिवसांच्या मुलीची साडेतीन लाखांत विक्री; आई-वडिलांसह सहा जणांना अटक

SCROLL FOR NEXT