मुंबई

तळोज्यामधील गृहिणी केबीसी हॉटसीटवर

CD

खारघर, ता. २ (बातमीदार) : ‘कौन बनेगा करोडपती’च्या मानाच्या खुर्चीत विराजमान होणे आणि महानायक अमिताभ बच्चन यांच्याशी संवाद साधण्याची संधी मिळावी, अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. तळोज्यामधील अर्चना उपाध्याय या गृहिणीने केबीसीच्या खुर्चीवर विराजमान होऊन साडेबारा लाख रुपये जिंकून सर्वांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे.
तळोजा सेक्टर सातमधील स्कायलाईन सफायर सोसायटीत वास्तव्यास असलेल्या अर्चना राहुल उपाध्याय या गृहिणी आहेत. तर पती डॉ. राहुल वैद्य हे नोकरी करतात. उपाध्याय दाम्पत्यास सहा मुले आहेत. ‘कौन बनेगा करोडपती’ या खेळात आपले ज्ञान, आपल्या बुद्धिमतेची परीक्षा होते. याच केबीसीच्या हॉटसीटवर गेल्यास अमिताभ बच्चन यांच्याशी संवाद साधता येईल, यासाठी आपणही या खेळात सहभागी व्हावे, असे अर्चना यांना वाटत होते. त्यांनी अनेक वेळा नोंदणी केली; मात्र यश आले नाही. या वर्षी मे महिन्यात त्यांनी पुन्हा नाव नोंदणी केली. काही दिवसांनी ‘कौन बनेगा करोडपती’ खेळासाठी पात्र ठरल्याचे समजले. ऑगस्ट महिन्यात हॉट सीटवर बसण्याची संधी मिळाली. पहिल्याच वेळी साडेबारा लाख रुपये जिंकण्याची संधी मिळाली. या खेळात पनवेल महापालिका हद्दीतील एकमेव महिलेने या खेळात साडेबारा लाख रुपये जिंकून महिलांसमोर आदर्श निर्माण केला आहे. त्यामुळे सर्वत्र कौतुक होत आहे.

कोन बनेगा करोडपतीसाठी पात्र ठरल्यावर मुलांसोबत अभ्यास सुरू ठेवला. विचारण्यात आलेल्या प्रश्नाला योग्य उत्तर देवून साडेबारा लाख रुपये जिंकले. घरदार सांभाळणाऱ्या गृहिणीला कमी लेखू नये. आपल्यात असलेले कला-कौशल्य दाखवण्यासाठी संधी असते. महिलांनी ते कौशल्य दाखवले पाहिजे. हा भाग ६ आणि ७ सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे. तेव्हा तळोज्यामधील गृहिणीने साडेबारा लाख जिंकल्याचे सर्वांना समजेल आणि नक्कीच पनवेल तालुक्यातील महिलांना आनंद होईल.
- अर्चना उपाध्याय, कोन बनेगा करोडपती विजेत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPO Market Alert : IPO मध्ये गुंतवणूक करायची आहे? या आठवड्यात शेअर बाजारात खुले होणार 6 नवे IPO; जाणून घ्या कधी आणि कोणते?

Parli Nagar Parishad Election: परळी नगर पालिकेत राष्ट्रवादीच्या आघाडीतून MIM बाहेर; सत्तास्थापनेनंतर नेमकं काय घडलं?

Latest Marathi News Live Update : राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या ग्रामीण जिल्हाध्यक्षाने दिला राजीनामा

Pune News : गणेश बिडकरांनी ओलांडला वीस लाख पावलांचा टप्पा; ६० हजार नागरिकांशी सहा महिन्यांत तीनदा थेट संपर्क

Apple Nutrition: लाल की हिरवे सफरचंद? जाणून घ्या आरोग्यासाठी कोणते फायदेशीर

SCROLL FOR NEXT