मुंबई

श्रीकृष्ण जन्मोत्सवला १०२ वर्षांची परंपरा

CD

करंजाडे, ता. ३ (बातमीदार)ः पनवेलच्या प्रभू आळीतील सीकेपी समाजाच्या लक्ष्मी-नारायण मंदिरातील साजऱ्या होणाऱ्या श्रीकृष्ण जन्मोत्सवाला १०२ वर्षांची परंपरा आहे. या सोहळ्यासाठी मंदिरात शाडूपासून बनवलेल्या श्रीकृष्णाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते. विशेष म्हणजे, पनवेलमधील कुंभार आळीतील धर्मा कुंभार यांच्या कुटुंबीयांना ही मूर्ती बनवण्याचा मान अनेक वर्षांपासून मिळत असून त्यांची चौथी पिढी या कामात मग्न आहे.
पनवेलच्या कुंभारवाड्यातील धर्मा कुंभार यांच्या चौथ्या पिढीतील नरेश कुंभार कुटुंबासह आपला पारंपरिक व्यवसाय सांभाळत आहेत. पूर्वी मडकी बनवण्याचा त्यांचा व्यवसाय आज काळाच्या ओघात मागे पडला आहे. एकीकडे पनवेल शहर विस्तारले आहे, तर दुसरीकडे सिडकोच्या वसाहतींमुळे शेतातली माती मिळत नसल्याने पारंपरिक मडकी बनवण्याचा व्यवसाय शेवटची घटका मोजत आहे. शिवाय मडकी भाजण्यासाठी भट्टी (आवा) लावली तर आजूबाजूच्या लोकांना त्रास होत असल्याने कुंभारांची गावे असलेल्या चौक, तुपगाव, मुरबाड व शहापूर येथून आणलेल्या मंडक्यांवर रंगकाम करून त्यांची विक्री केली जात आहे. विशेष म्हणजे, नरेश कुंभार यांच्या कामात त्यांची आई, पत्नी, मुलगा, मुलगी, तसेच भावाची पत्नी व मुलेही मदत करत असल्याने पूर्वजांपासून सुरू असलेला व्यवसाय जगवण्याची धडपड नवी पिढी करत आहे.
----------------------------------------------
पनवेलमधील सीकेपी समाजाच्या लक्ष्मी-नारायण मंदिरात श्रीकृष्णाची चार हातवाली विष्णूसारखी मूर्तीला १०२ वर्षांची परंपरा आहे. ही मूर्ती बनवण्याचा मान पिढ्यानपिढ्या कुंभार कुटुंबाला आहे. या सोहळ्यासाठी लागणारी मूर्ती इतर कोठेही मिळत नाही.
- नरेश कुंभार, मूर्तिकार, पनवेल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT