मुंबई

हास्य मनाच्या व्याधीवरील सर्वोत्तम उपचार - डॉ. सुरेश पाटील

CD

विरार, ता. ६ (बातमीदार) : म्हातारपणात येणारे नैराश्य, वेगवेगळ्या आजरांमुळे चिडचिड होते. यावर मात करायची असेल तर नेहमी हसतखेळत राहायला हवे. हास्य मनाच्या व्याधीवरील सगळ्यात चांगला उपचार असल्याचे प्रतिपादन मानसोपचारतज्ज्ञ डॉ. सुरेश पाटील यांनी वसई येथे ज्येष्ठ नागरिकांच्या कार्यक्रमात केले.

ज्येष्ठ नागरिक समाजकल्याण संस्था पापडी वसई व वसई तालुका पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच हुतात्मा बाळा सावंत स्मारक पापडी येथे ज्येष्ठांसाठी मनोविकाराबाबत मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात मानसोपचारतज्ज्ञ डॉ. सुरेश पाटील यांनी मार्गदर्शन केले.

डॉ. सुरेश पाटील यांनी खेळीमेळीच्या वातावरणात ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधताना त्यांच्या मनातील अनेक प्रश्नांना उत्तरे दिली. आपले वय होत असतानाही मनाने तरुण राहण्याचा प्रयत्न करायला हवा. रोज चालणे, संतुलित आहार घेणे अशा गोष्टींकडे लक्ष द्यायला हवे. उतारवयात डायबेटीस आणि ब्लड प्रेशर हे राहू-केतूप्रमाणे जीवनात आलेले असतात. त्यांना दूर ठेवण्यासाठी तणावमुक्त राहा, असा सल्ला त्यांनी या वेळी ज्येष्ठ नागरिकांना दिला. कार्यक्रमाला ज्येष्ठ नागरिक संघाच्या अध्यक्षा हेमलता हटकर, विंदाली प्रभुदेसाई, भरत म्हात्रे, अरुणसिंग, शिवकुमार शुक्ला आणि आनंद गदगी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thalapathy Vijay : मुख्यमंत्री थलपती विजय यांचा केंद्र सरकारसह अदाणींना मोठा दणका; २० हजार कोटींच्या स्मार्ट मीटर प्रकल्प केला बंद

Latest Marathi News Live Update : अमरावती पोलिस अंमलदारच निघाला गुटखा तस्कर

Shivam Associates Scam : 'शिवम'मध्ये महाराष्ट्रातील 10 हजार लोकांचे पैसे बुडाले? 'सीआयडी'च्या रडारवर सनी लिओनी, 2400 कोटींचा घोटाळा नेमका काय आहे?

Railway Online Food Fraud : रेल्वे प्रवासात ऑनलाईन जेवण मागवताय? सावधान! मोठा स्कॅम उघड; IRCTC ची मोठी कारवाई

T20 Mumbai League: सूर्यकुमार यादवचे अम्पायरसोबत भांडण; वानखेडे स्टेडियमवर हायव्होल्टेज ड्रामा, संघ हरला अन्...

SCROLL FOR NEXT