मुंबई

‘बहरू द्या फुलांना...! मधून पालकांना मिळाला कानमंत्र

CD

दहिसर येथील मराठी शाळेत ‘एनआयई’च्‍या उपक्रमाला पसंती
‘बहरू द्या फुलांना...!’ मधून पालकांना मिळाला कानमंत्र
मालाड, ता. ४ (बातमीदार) ः दहिसर येथील शैलेंद्र एज्युकेशन सोसायटीच्या मराठी प्राथमिक शाळेत पालकांसाठी ‘सकाळ’द्वारे घेण्यात आलेला ‘बहरू द्या फुलांना...!’ मार्गदर्शनपर कार्यक्रम उत्साहात पार पडला. या वेळी पालकांसाठी प्रख्यात समुपदेशक आरती बनसोडे यांचा मोटिव्हेशनल सेमिनारचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात श्वेता पाटील आणि विद्यार्थ्यांच्या स्वागतगीतांनी झाली.
या वेळी समुपदेशक आरती बनसोडे यांनी बाल शिक्षणात पालकांची गुंतवणूक, मुलांची होणारी चिडचिड, मुलांचा वाढलेला उद्धटपणा, मुलांचे अभ्यासावर लक्ष केंद्रित न होणे; तसेच मोबाईलच्‍या आहारी जाण्याचे वाढलेले प्रमाण याविषयी चिंता व्‍यक्‍त करून उपायदेखील देण्यात आला. अगदी सोप्या भाषेत पालकांना उदाहरणे देऊन त्‍यांचे मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी पालकांनी आपल्‍या पाल्‍याच्‍या अभ्यासाचे वेळापत्रक कसे तयार करावे आदी बाबींची माहिती देण्यात आली. तसेच जेवताना मुलांशी संवाद साधणे, त्‍यांच्‍याबरोबर एखादा खेळ खेळणे अशा गोष्टी केल्‍याने मुलांचा कौटुंबिक जिव्‍हाळा वाढू शकेल, याची सखोल माहिती आरती बनसोडे यांनी दिली. तसेच पालकांनी विशेष करून मुलांना ‘सकाळ’चे ‘एनआयई’ वृत्तपत्र वाचायला द्यावे, जेणेकरून मुलांची वाचनाची गोडी वाढेल आणि सामान्य ज्ञानामध्ये भर पडेल, असे बनसोडे यांनी यावेळी सांगितले. या वेळी शाळा समिती अध्यक्ष तसेच कार्यकारिणी सदस्य मंदार मयेकर, शाळेच्‍या मुख्याध्यापिका आशा विचारे यांची प्रमुख उपस्थितीत होती; तर निवेदन विद्या पाटील यांनी केले व अनिता राऊत यांनी आभार मानले.
.....................................
प्रतिक्रिया
आरती बनसोडे यांनी आपल्या ओघवत्या वक्तृत्व शैलीतून विविध प्रसंग उदाहरण कथन करून हलक्या-फुलक्या वातावरणात पालकांच्या मनावरील दडपण दूर करत संवाद साधला. त्यामुळे पालकांनीही संकोच न करता आपल्या समस्या मांडल्या. तसेच पालक हा आपल्या पाल्याचा पहिला समुपदेशक असतो, हा कानमंत्र या वेळी दिला. या कार्यक्रमामुळे आपल्या पाल्याचे समुपदेशक होण्याचा आत्मविश्वास पालकांच्या मनात नक्कीच निर्माण झाला असणार.
- आशा विचारे, मुख्याध्यापिका, मराठी प्राथमिक विभाग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पाकिस्तान पुन्हा बनतोय 'दहशतवादाचा कारखाना'; जैश-लष्करचे तब्बल 300 नवे अड्डे उभारण्याची तयारी, कोण देतंय इतका पैसा?

हत्तीच्या हल्ल्यात पतीचा मृत्यू, ६ लाखांची नुकसान भरपाई; ६ महिलांचा दावा, म्हणतात,'मीच खरी पत्नी'

AUS vs SA, ODI: १८ षटकार अन् ३६ चौकार! हेड, मार्श अन् ग्रीन बरसले, ऑस्ट्रेलिया ४०० पार; अनेक विक्रम मोडले

Latest Marathi News Updates : साईबाबांच्या लाडू प्रसादामध्ये संस्थानकडून 50 टक्के वाढ

Ganpati Bappa 2025: गणपती बाप्पाला दुर्वा का अर्पण करतात? जाणून घ्या कारण आणि महत्त्व

SCROLL FOR NEXT