आळंदी (ता. खेड) - माउलींच्या समाधी प्रसंगावर सोमवारी कीर्तन करताना नामदेव महाराजांचे वंशज भावार्थ महाराज नामदास. 
मुंबई

संत साहित्य आजही टिकून, कीर्तनकारांमुळे महाराष्ट्रात श्रवणाची परंपरा

CD

विरार, ता. २४ (बातमीदार) : संत ब्रह्मनिष्ठ होते. ते ज्ञानी होते आणि कृपाळू देखील होते. म्हणून संत साहित्य आजही टिकून आहे. महाराष्ट्रातील वेगवेगळ्या पंथांच्या कीर्तन परंपरेने संतांचा विचार तळागाळात नेऊन आपली आध्यात्मिक जडणघडण केली. कीर्तन परंपरेने या राज्यात ऐकण्याची परंपरा निर्माण केली. ज्यांच्या कानावर शब्द पडले, ज्यांनी ते ग्रहण केले, त्यांचे आयुष्य बदलले. करमणुकीच्या साधनांचा अतिरेक झालेला असतानाही माणसे आज कीर्तनासाठी एकत्र येतात, ही आशादायक घटना आहे, असे उद्‍गार‍ डॉ. भावार्थ देखणे यांनी काढले.

भुईगाव येथे चंपावती मंदिर न्यास आयोजित कीर्तन रंग सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी ते बोलत होते. शारदीय नवरात्रोत्सवानिमित्ताने राज्यभरातील प्रख्यात कीर्तनकार भुईगावात येऊन आपली सेवा देत आहेत. या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन गावातील तरुण करत आहेत, ही आनंदाची बाब आहे, असे कार्यक्रमाचे मुख्य संयोजक नारायण नाईक म्हणाले. कवी सायमन मार्टिन यांच्या हस्ते डॉ. भावार्थ देखणे यांचा ग्रामस्थांच्या वतीने सन्मान करण्यात आला. याच सप्ताहात हरिबुवा नातू व मोहक बुवा रायकर यांनी संत वाङ्मयाची फलश्रुती या विषयावर निरूपण केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain: महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा कहर! मुख्यमंत्री फडणवीसांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन; दिला सतर्कतेचा इशारा

Nagpur Vidhan Bhavan Project: नागपूर विधानभवनाचे रूपडे पालटणार; १,००० कोटींचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प, दोन्ही सभागृह येणार एकाच छताखाली

Latest Marathi Live Update : लोणावळ्या कडे जाणाऱ्या रोडवर दरड कोसळली, कातळ धबधबा शेजारची घटना

Maharashtra Rain: पालघरमध्ये मुसळधार! 24 तासांत 134 मिमी पाऊस, जनजीवन विस्कळीत; वाहतूक ठप्प

Navi Mumbai: बटाटावड्यात आढळली अळी, नवी मुंबई महापालिकेच्या भोजनालयातील प्रकार

SCROLL FOR NEXT