

Palghar Rain
ESakal
पालघर : पालघर जिल्ह्यात गेल्या 24 तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. जिल्ह्यात सर्वत्र पाणीच पाणी झाल्याने रस्ते जलमय झाले असून अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प झाली आहे. राष्ट्रीय महामार्गासह अंतर्गत रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला.