Maharashtra Rain: महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा कहर! मुख्यमंत्री फडणवीसांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन; दिला सतर्कतेचा इशारा

Heavy Rain Maharashtra: मुंबई, नवी मुंबई, पालघर, ठाणे, कोल्हापूर, रायगड आणि लोणावळ्यासह अनेक जिल्ह्यांमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून वाहतूक कोंडी झाली आहे.
Heavy Rain Maharashtra

Heavy Rain Maharashtra

ESakal

Updated on

शनिवारी (४ जुलै) मुंबईसह महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस झाला. संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. राज्यभरातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, हवामान विभाग दर तीन तासांनी सूचना पाठवत आहे. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे (एनडीआरएफ) पथक सतर्क आहे. त्यांनी लोकांना हवामान विभागाची सूचना तपासल्यानंतरच बाहेर पडण्याचे आवाहन केले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com