मुंबई

प्रदूषणात वाढ ठाणे प्रशासन निद्रावस्थेत

CD

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १२ : मुंबई महापालिकेकडून हवेच्या घटत्या गुणवत्तेबाबत कडक पावले उचलली जात आहेत. सरकारही याबाबत गंभीर असून लवकरच संपूर्ण एमएमआर क्षेत्रात वायुप्रदूषण रोखण्यासाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली आहेत. असे असताना, ठाण्यात प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे समोर येत आहे. ठाणे शहरात धूळ नियंत्रणासाठी बसवलेल्या मशीन बंद असून त्या धूळखात आहेत. त्यामुळे महापालिका प्रशासन प्रदूषणाबाबत गंभीर नसल्याचे दिसून येत आहे; तर रस्ता खोदण्यात आल्याने मशीनचा वीजपुरवठा बंद झाला असून, त्यामुळे माजिवडा चौकातील धूळ नियंत्रण मशीन बंद असल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला.
ठाणे शहरातून जाणारे महामार्ग, प्रमुख रस्ते आणि अंतर्गत रस्त्यांवर सतत वाहनांची वर्दळ असते. या वाहतुकीमुळे आवाज आणि धुळीच्या कणांचे प्रमाण वाढले आहे. प्रदूषणामुळे मुंबई शहरातील हवेची पातळी मोठ्या प्रमाणात कमी होत असल्याचे चित्र गेल्या काही दिवसांपासून समोर येत आहे. काही दिवसांपूर्वी मुंबई महापालिकेने नागरिकांना मास्क वापरण्याच्या सूचना दिल्या होत्या. तसेच, विकासकांना बांधकामाच्या ठिकाणी पाणी शिंपडणारी यंत्रणा आणि धूळ शोषणारी मशीन कार्यान्वित करण्याचा इशारा देण्यात आला आहे. ठाणे शहरातही अनेक ठिकाणी इमारती बांधण्याचे काम सुरू आहे. शहरात मोठ्या प्रमाणात धुळीचे लोट पाहायला मिळत आहेत.
केंद्र सरकारच्या राष्ट्रीय स्वच्छ हवा कृती आराखड्यांतर्गत सात महिन्यांपूर्वी मिळालेल्या सुमारे एक कोटींच्या रकमेतून ठाणे महापालिकेने शहरात बसविलेली धूळ नियंत्रण यंत्रे बंद अवस्थेत असल्याचे समोर आले आहे. धुळीचे प्रदूषण कमी करण्यासाठी मशीनद्वारे पाण्याची फवारणी केली जाते. शहरातील सर्वात वर्दळीच्या चौक असलेल्या माजिवडा आणि विटावा येथे प्रत्येकी दोन मशीन बसविण्यात आल्या आहेत. पावसाळ्यापूर्वी ही यंत्रे सुरू होती. पावसाळ्यात ही यंत्रे बंद पडली. आता पाऊस संपून महिना उलटला, तरी ही यंत्रे बंद अवस्थेत आहेत.

..........................
अशा प्रकारे मिस्ट स्प्रे मशीन करते काम
हे यंत्र जमिनीपासून १५ फूट उंचीवर बसवण्यात आले असून ते ३२० अंश फिरते. त्यातून पाणी ३० मीटर अंतरापर्यंत पाणी उडते. त्या पाण्यामुळे रस्त्यावरील धूळ ओलसर होते आणि धुळीचे कण हवेत मिसळत नाहीत. रस्त्यावरील ओलसर धुळीमुळे वाहनांना कोणतीही हानी होत नाही आणि मिस्ट स्प्रे मशीन हवेतील २.५ मायक्रॉन धूळ शोषून घेते आणि बाहेर पाणी आणि स्वच्छ हवा सोडते.

.........................
विटावा येथे यंत्रणा कार्यरत असून, माजिवडा चौकातील यंत्रणा लवकरच कार्यान्वित होणार आहे. काही तांत्रिक कारणांमुळे ही यंत्रणा बंद आहे.
- मनीषा प्रधान, मुख्य प्रदूषण नियंत्रण अधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Citizen Participation Budget: पुणे महापालिकेचा लोकाभिमुख अर्थसंकल्प: नागरिकांना ३१ ऑगस्टपर्यंत ऑनलाइन विकासकामे सुचविण्याची संधी

Pune Road Safety: राजाबहादूर मील रस्त्यावर बिल्डरची मुजोरी कायम; चिखलामुळे अपघात, महापालिकेचा दंड व काम थांबवण्याचा इशारा

Agni 4 missile: 'डीआरडीओ'कडून 'अग्नी-4' ची यशस्वी चाचणी, तब्बल चार हजार किलोमीटरपर्यंतचे लक्ष्य भेदणार!

''Gen Z सगळ्यात प्रामाणिक पिढी, सरकारने आधीच बोलणी करायला पाहिजे होती'', सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले?

Pune civic roads issue: पुण्यात खड्ड्यांचा मारा कायम; महापौरांचा ‘यंदा खड्डे कमी’ दावा, स्थायी समिती अध्यक्षांनी शहरात भरपूर खड्डे असल्याचे मान्य

SCROLL FOR NEXT